क्रशची Instagram Story पाहायची? तेही तिला कळू न देता! ह्या ट्रिक्स करतील तुम्हाला मदत
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम सध्या सर्वचजण वापरतात. इथे आपण अनेकांना फॉलो करतो. यातील काही लोक आपल्या ओळखीचे असतात तर काही सेलिब्रिटी असतात. या सर्वांनी शेअर केलेले पोस्ट आणि स्टोरी आपण बघतो. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेली स्टोरी 24 तासांपर्यंत लाईव्ह असते आणि त्यानंतर ती हटवली जाते. जर युजरने ही स्टोरी त्याच्या हायलाईटमध्ये अॅड केली तर आपण ही स्टोरी 24 तासांनंतर देखील पाहू शकतो.
स्टोरी लाईव्ह असताना आपण जर ती बघितली तर समोरच्या युजरला समजतं. पण जर तुम्हाला समोरच्या इंस्टाग्राम युजरला कळू न देता त्याची स्टोरी पाहायची असेल तर त्यासाठी काही सोप्या ट्रीक्स आहेत. या ट्रीक्सच्या मदतीने तुम्ही अगदी सहज कोणत्याही व्यक्तिची इंस्टाग्राम स्टोरी पाहू शकता आणि त्या व्यक्तिला समजणार देखील नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
जर तुम्हाला एखाद्याची स्टोरी चोरून पहायची असेल, तर तुम्ही फेक किंवा दुसरे इंस्टाग्राम अकाउंट बनवून त्या अकाउंटवरून स्टोरी पाहू शकता.
अशा अनेक वेबसाइट्स आणि ॲप्स आहेत जे तुम्हाला कोणाची तरी स्टोरी त्यांच्या नकळत पाहू देतात. जसे की StoriesIG, InstaStories, इत्यादी. या वेबसाइट्सना भेट द्या आणि संबंधित यूजरनेम प्रविष्ट करा आणि त्यांची स्टोरी त्यांच्या नकळत पहा.
WhatsApp ला NPCI कडून मिळालं न्यू ईयर गिफ्ट, आता सर्व यूजर्सना मिळणार या सर्विसचा फायदा
टीप: थर्ड-पार्टी टूल्स वापरताना सावधगिरी बाळगा कारण यामुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. एखाद्याची स्टोरी त्यांच्या नकळत पाहण्याचा प्रयत्न करणे त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन असू शकते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या नैतिकता आणि अटींचे नेहमी पालन करा.