Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram आणि WhatsApp मध्ये होणार हे बदल, नवीन फीचर्समुळे युजर्सचा अनुभव होणार अधिक मजेदार

व्हॉट्सॲप फीचरच्या माध्यमातून यूजर्स आता त्यांच्या स्टेटसमध्ये म्युझिक शेअर करू शकतील. व्हॉट्सॲपवर येणारे हे फीचर इंस्टाग्रामवर आधीपासूनच लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामने त्यांचे जुने फीचर एका नवीन स्वरूपात रोलआऊट केलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 18, 2025 | 12:29 PM
Instagram आणि WhatsApp मध्ये होणार हे बदल, नवीन फीचर्समुळे युजर्सचा अनुभव होणार अधिक मजेदार

Instagram आणि WhatsApp मध्ये होणार हे बदल, नवीन फीचर्समुळे युजर्सचा अनुभव होणार अधिक मजेदार

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स लाँच करत असतात. आता देखील कंपनी त्यांच्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप युजर्ससाठी लवकरच नवीन फीचर्ल रोलआऊट करणार आहे. या फीचरबद्दल जाणून घेऊया.

CES 2025: हे AI डिव्हाईस वाचणार तुमचं मन? ब्रेन कंप्यूटर इंटरफेस फीचरसह सुसज्ज, किंमत केवळ इतकी

व्हॉट्सॲप फीचरच्या माध्यमातून यूजर्स आता त्यांच्या स्टेटसमध्ये म्युझिक शेअर करू शकतील. यासाठी ड्रॉईंग एडिटरमध्ये नवीन म्युझिक बटण देण्यात आले आहे. यावर टॅप करून यूजर्स त्यांच्या आवडीची गाणी निवडू शकतील. व्हॉट्सॲप या फीचरवर बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे आणि आता ते बीटा यूजर्ससाठी आणले गेले आहे. हळूहळू हे फीचर सर्व युजर्ससाठी रोल आऊट केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

वैशिष्ट्य कसे कार्य करेल?

व्हॉट्सॲपच्या या फीचरमध्ये यूजर्स म्युझिक बटणावर क्लिक करून त्यांच्या स्टेटसच्या फोटो आणि व्हिडिओनुसार त्यांचे आवडते गाणे निवडू शकतील. येथे मेटाने तीच म्युझिक कॅटलॉग दिली आहे जे इंस्टाग्रामवर देखील उपलब्ध आहे. म्युझिक लायब्ररीमध्ये यूजर्सना इंस्टाग्रामप्रमाणे त्यांचे आवडते गाणे आणि आर्टिस्ट निवडण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, त्यांना ट्रेंडिंग ट्रॅक देखील दाखवले जातील, जे ते त्यांच्या स्टेटसमध्ये वापरण्यास सक्षम असतील.

अशा प्रकारे म्यूझिक क्लिप निवडा

एकदा म्यूझिक निवडल्यानंतर, वापरकर्त्यांना त्यांना त्यांच्या स्टेटसला गाण्याचा जो भाग ठेवायचा आहे तो निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. फोटो स्टेटसमध्ये, जास्तीत जास्त 15 सेकंदांची म्यूझिक क्लिप निवडली जाऊ शकते, तर व्हिडिओसाठी असे कोणतेही बंधन नाही. एकदा म्यूझिक क्लिप निवडल्यानंतर, ती स्टेटससह इंटीग्रेट केली जाईल. हे स्टेटस आकर्षक आणि एंटरटेनिंग बनविण्यात मदत करेल.

हे फीचर इंस्टाग्रामवर आधीपासूनच लोकप्रिय

व्हॉट्सॲपवर येणारे हे फीचर इंस्टाग्रामवर आधीपासूनच लोकप्रिय आहे. इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करताना म्यूझिक क्लिप निवडण्याची प्रक्रिया अगदी सारखी आहे. आता हे व्हॉट्सॲपवर देखील रोल आऊट केल्यानंतर, मेटाने त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवर समान वापरकर्ता अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हॉट्सॲपसोबतच आता इंस्टाग्रामवर देखील दोन मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. कंपनीने सांगितले की आता कंटेट प्रोफाइल ग्रिडवर स्क्वेयर ऐवजी रेक्टेंगल बॉक्समध्ये दिसेल. याशिवाय आता मित्रांच्या पसंतीच्या रील वेगळ्या सेक्शनमध्ये दिसणार आहेत. या दोन बदलांबद्दल कंपनीने काय सांगितलं आहे, याबद्दल जाणून घेऊया. इंस्टाग्रामचे चीफ ॲडम मोसेरी म्हणाले की रेक्टेंगल बॉक्समध्ये कंटेट दर्शविणारे फीचर या आठवड्याच्या शेवटी रोलआउट केले जाईल.

Tech Tips: छोट्या रिचार्जमध्येही दिवसभर चालेल WhatsApp, फक्त करा ही छोटी सेटिंग!

मित्रांना आवडलेली रील वेगळी दिसेल

आता इंस्टाग्रामने त्यांचे जुने फीचर एका नवीन स्वरूपात रोलआऊट केलं आहे. वास्तविक, इंस्टाग्रामने 2019 मध्ये अ‍ॅक्टिव्हिटी फीड बंद केले होते. यामध्ये यूजर्सना ते व्हिडीओ दाखवण्यात आले जे त्यांच्या मित्रांनी लाईक केले होते. आता नवीन फीचरमध्ये, Reels फीडमध्ये एक नवीन टॅब दिसेल, ज्यामध्ये त्यांच्या मित्रांनी लाईक केलेले किंवा कमेंट केलेले व्हिडिओ दिसतील.

Web Title: Tech news instagram and whatsapp will rollout new features soon know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 12:29 PM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

जगभरतील यूजर्सवर धोक्याची घंटा! WhatsApp मधून 3.5 बिलियन मोबाईल नंबर झालेत लीक? सत्य वाचून व्हाल हैराण
1

जगभरतील यूजर्सवर धोक्याची घंटा! WhatsApp मधून 3.5 बिलियन मोबाईल नंबर झालेत लीक? सत्य वाचून व्हाल हैराण

Tech Tips: नवऱ्यापासून लपवायची आहे तुमची शॉपिंग पेमेंट हिस्ट्री? Paytm वर असं वापरा ‘हाइड पेमेंट्स’ फीचर
2

Tech Tips: नवऱ्यापासून लपवायची आहे तुमची शॉपिंग पेमेंट हिस्ट्री? Paytm वर असं वापरा ‘हाइड पेमेंट्स’ फीचर

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा
3

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी
4

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.