IRCTC Down: पुन्हा डाऊन झाली IRCTC वेबसाईट, तिकीट बुक करताना प्रवाशांमध्ये गोंधळ
भारतीय रेल्वेचा ऑनलाइन तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म असलेल्या IRCTC ची ऑनलाइन वेबसाइट आज गुरुवार, 26 डिसेंबर रोजी पुन्हा डाऊन झाली आहे. तात्काळ तिकीट बुकींगच्या वेळी ही वेबसाईट अचानक डाऊन झाली, त्यामुळे युजर्सना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी 10.20 च्या सुमारास वेबसाइट अचानक डाऊन झाली.
Year Ender 2024: यावर्षी लाँच झाले जबरदस्त स्मार्टवॉच, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील कमाल
काही दिवसांपूर्वी देखील IRCTC ची ऑनलाइन वेबसाइट तात्काळ तिकीट बुकींगवेळी डाऊन झाली होती. आज पुन्हा एखदा ही वेबसाईट डाऊन झाली आहे. त्यामुळे युजर्सनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म एक्सवर IRCTC ला टॅग करत वेबसाईट डाऊन असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. (फोटो सौजन्य – X)
भारतीय रेल्वेची ई-तिकीटिंग सेवा IRCTC पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. त्यामुळे देशभरातील लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वेच्या वेबसाइट आणि मोबाईल ॲपवर काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंग, ट्रेनची माहिती आणि इतर ऑनलाइन सेवा वापरण्यात अडचणी निर्माण होत आहेत. Downdetector, ऑनलाइन व्यत्ययांचा मागोवा घेणारी साइट, ने देखील आउटेजची पुष्टी केली आहे. IRCTC ने अद्याप या मोठ्या आउटेजवर प्रतिक्रिया दिलेली नाही.
Tech Tips: गर्लफ्रेंडने WhatsApp वर ब्लॉक केलंय? नो टेंशन, या ट्रीकने सेंड होईल तुमचा मॅसेज
तात्काळ बुकिंग करण्यापूर्वी, IRCTC वेबसाइट डाउन होते. वेबसाईट ओपन केल्यावर एक मेसेज येत आहे, ज्यामध्ये मेन्टेनन्समुळे वेबसाईट बंद असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे तत्काळ तिकीट बुकिंग 11 वाजता सुरू होते. ही बुकींग सुरु होण्याच्या अगदी काही क्षणापूर्वी वेबसाईट डाऊन झाली. ज्यामुळे युजर्सना तिकीट बुक करण्यात अडचणी निर्माण झाल्या. वेबसाइटवर समस्या का आली हे अद्याप स्पष्ट झाले नाही? याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
IRCTC ने अद्याप या मोठ्या आउटेजवर प्रतिक्रिया दिलेली नाही. IRCTC ॲप उघडल्यावर, ‘मेन्टेनन्समुळे वेबसाईट बंद आहे’ अशी त्रुटी पॉप-अप दिसते. त्याचवेळी IRCTC साईटवर ‘सॉरी!!!’ कृपया पुन्हा प्रयत्न करा!’ मेसेज येत आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स या आउटेजबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
रेल्वे मंत्री आणि रेल्वे मंत्री यांना टॅग करताना एका यूजरने सांगितले की, सकाळी 10 वाजता IRCTC साईट क्रॅश होते आणि जेव्हा ती उघडते तेव्हा सर्व तत्काळ तिकिटे बुक झालेली असतात. यामुळे आता अनेकांनी संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी 9 डिसेंबरलाही आयआरसीटीसीची साईट तासाभरासाठी डाऊन झाली होती. याचे कारणही ई-तिकीटिंग प्लॅटफॉर्मने मेंटेनन्स असल्याचे सांगितले.
India is the largest IT hub in the world, yet it cannot fix a website. You can collect taxes but fail to provide proper services in return. What a shame!@IRCTCofficial @RailwaySeva @RailMinIndia #IRCTC #Down #Rail pic.twitter.com/AAl8ljmSr5
— Guy On The Street (@msdneville) December 26, 2024
#irctc portal is down and showing downtime message during peak tatkal booking hours.😂@IRCTCofficial@AshwiniVaishnaw #TatkalBooking pic.twitter.com/TsinuBbX2d
— Lord Stark (@BloodOf_Dragon) December 26, 2024
How can IRCTC website go down during tatkal timings???Why are we even bothering about building a bullet train when we can’t even build a fucking website??@AshwiniVaishnaw @VSOMANNA_BJP #IRCTC
Pls retweet @GabbbarSingh pic.twitter.com/YOPNn1n3h9
— Akshay (@aksh__96) December 26, 2024
Site goes under maintenance during Tatkal booking time. Absolutely amazing 🙌
The portal works for agents and tickets getting booked at offline windows.
Clear msg from @IRCTCofficial @IndianRailMedia to online individual users – F OFF!@BJP4India have better ministers!#irctc pic.twitter.com/DZaHTbk2lx
— JACKIN MOTA (@JACKIN_GOONER) December 26, 2024