Year Ender 2024: यावर्षी लाँच झाले जबरदस्त स्मार्टवॉच, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील कमाल
2024 मध्ये टेक क्षेत्रात बरीच प्रगती करण्यात आली. अनेक नवीन गॅझेट्स लाँच झाले, ज्यामध्ये अनोख्या फीचर्सचा समावेश होता. कधी हटके फीचर्ससह स्मार्टवॉच तर कधी AI फीचर्ससह स्मार्टफोन. प्रत्येक गॅझेटमध्ये काहीतरी नवीन होतं. 2024 मध्ये अनेक स्मार्टवॉच लाँच करण्यात आले. काही बजेट रेंजमध्ये होते तर काही प्रिमियम प्राईजमध्ये. आता आम्ही तुम्हाला 2024 मध्ये लाँच झालेल्या बेस्ट स्मार्टवॉचबद्दल सांगणार आहोत.
Tech Tips: गर्लफ्रेंडने WhatsApp वर ब्लॉक केलंय? नो टेंशन, या ट्रीकने सेंड होईल तुमचा मॅसेज
नॉईज कलरफिट स्मार्टवॉच हे सर्वोत्तम ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.96 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रीमियम मेटॅलिक बिल्ड आणि फंक्शनल क्राउन यामुळे स्मार्टवॉच आणखी क्लासी बनते. या स्मार्टवॉचमध्ये जेश्चर कंट्रोल फीचरसह ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा आहे. हे स्मार्टवॉच तुम्हाला तुमच्या मनगटातून थेट कॉल करण्याची आणि रिसिव्ह करण्याची परवानगी देते. नॉईज कलरफिट स्मार्टवॉचची किंमत 7,999 रुपये आहे परंतु डिस्काउंट ऑफरसह तुम्ही हे स्मार्टवॉच 2,499 रुपयांना खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
Fastrack New Astor Fs1 Pro स्मार्टवॉच मोठ्या सुपर AMOLED डिस्प्लेसह येते. या स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. हे स्मार्टवॉच IP68 वॉटर रेसिस्टंट आणि फंक्शनल क्राउनसह येते. या फास्ट्रॅक स्मार्टवॉचमध्ये हायड्रेशन अलर्ट, स्लीप, स्ट्रेस मॉनिटर, ॲडव्हान्स हेल्थ फीचर, मल्टिपल वॉच फेस देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचमध्ये 5 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप आहे. या स्मार्टवॉचमध्ये कॅलेंडर, इन बिल्ट गेम्स आणि एसओएस कॉलिंगसारख्या सुविधा आहेत.
Google Pixel Watch दोन आकारांमध्ये लाँच करण्यात आले आहे, ज्यामध्ये 3 41mm आणि 45mm यांचा समावेश आहे. हे स्मार्टवॉच जीपीएससह क्वालकॉम SW5100 सह येते. हे स्मार्टवॉच Android 10.0 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. नेहमी ऑन डिस्प्ले आणि हार्ट-रेट सेन्सर यासारख्या अनेक आरोग्य सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत. या घड्याळाची बॅटरी 24 तास चालण्यास सक्षम आहे. Google Pixel Watch 3 ची सुरुवातीची किंमत 38,990 रुपये आहे.
सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा कंपनीच्या प्रीमियम स्मार्टवॉचच्या यादीत समाविष्ट आहे. हे स्मार्टवॉच 47mm आकारात लाँच करण्यात आले आहे. या वाचची फ्रेम टायटॅनियमची आहे. हे स्मार्टवॉच 1.5 इंच AMOLED डिस्प्ले आणि नेहमी ऑन डिस्प्ले फंक्शनने सुसज्ज आहे. या स्मार्टवॉचची कमाल ब्राइटनेस 3000 nits आहे. या स्मार्टवॉचमध्ये 590mAh बॅटरी आहे. या स्मार्टवॉचमध्ये आरोग्य सुविधांसोबतच अनेक स्पोर्ट्स मोड फीचर्सही उपलब्ध आहेत. याची किंमत जवळपास 59,999 रुपये आहे.
Apple Watch Series 10 हे कंपनीचे सर्वात पातळ आणि सर्वात मोठा डिस्प्ले असलेले स्मार्टवॉच आहे. या स्मार्टवॉचमध्ये OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये कॉलिंगसाठी स्पीकर आणि मायक्रोफोन आहे. स्मार्टवॉचमध्ये रिमाइंडरची सुविधाही उपलब्ध आहे. स्मार्टवॉचमध्ये पर्यावरणविषयक सूचना, AFib अलर्ट, एडवांस स्लीप ट्रॅकिंग आहे. हे स्मार्टवॉच अत्याधुनिक ऑपरेटिंग सिस्टमवर चालते. या स्मार्टवॉचला 50 एटीएम रेटिंग आहे. Apple Watch Series 10 ची सुरुवातीची किंमत 46900 रुपये आहे.