Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर JIO लाँच करणार हे खास फीचर, युजर्सना मिळणार बचत करण्याची संधी

तुम्ही कोणत्याही साउंड बॉक्सशिवाय JioSoundPay वरून UPI ​​पेमेंटसाठी अलर्ट मिळवू शकणार आहात. यामुळे लहान किराणा दुकाने, भाजी विक्रेते आणि रस्त्यालगत खाद्यपदार्थ विक्रेते यांना व्यवसाय करणे सोपे होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 25, 2025 | 08:50 AM
प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर JIO ने लाँच करणार हे खास फीचर, युजर्सना मिळणार बचत करण्याची संधी

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर JIO ने लाँच करणार हे खास फीचर, युजर्सना मिळणार बचत करण्याची संधी

Follow Us
Follow Us:

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स घेऊन येत असते. आता देखील कंपनी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर त्यांच्या युजर्ससाठी नवीन फीचर लाँच करणार आहे. हे फीचर युजर्ससाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहे, कारण या फीचरच्या मदतीने युजर्सच्या पैशांची बचत होणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या फीचरचं नाव आहे JioSoundPay. हे फीचर अद्याप सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलेलं नाही, मात्र लवकरच ही सेवा सर्वांसाठी सुरु होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

फ्रीमध्ये OTT सबस्क्रिप्शन मिळवण्याची संधी! Flipkart करणार तुमची मदत, फक्त करा हे काम

प्रजासत्ताक दिनी जिओ JioSoundPay सेवा लाँच करणार आहे. हे वैशिष्ट्य JioBharat फोनवर आजीवन मोफत उपलब्ध असेल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. वास्तविक, तुम्ही कोणत्याही साउंड बॉक्सशिवाय JioSoundPay वरून UPI ​​पेमेंटसाठी अलर्ट मिळवू शकता. भारतातील कोणत्याही मोबाईल फोनवर उपलब्ध असलेले हे पहिलेच वैशिष्ट्य आहे. देशातील 5 कोटीहून अधिक लघु उद्योजक आणि छोट्या व्यापाऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

वर्षाला 1,500 रुपयांची बचत होईल

कंपनीच्या म्हणण्यानुसार, JioSoundPay ही एक महत्त्वाची ग्राउंडब्रेकिंग इनोवेशन आहे. जे प्रत्येक UPI पेमेंटचा झटपट आणि मल्टीलिंगुअल ऑडियो अलर्ट संदेश देईल. यामुळे लहान किराणा दुकाने, भाजी विक्रेते आणि रस्त्यालगत खाद्यपदार्थ विक्रेते यांना व्यवसाय करणे सोपे होणार आहे. सध्या लहान-मोठे व्यापारी साउंड बॉक्ससाठी दरमहा सुमारे 125 रुपये खर्च करतात. मात्र आता त्यांच्या या पैशांची बचत होणार आहे. JioSoundPay वर आता मोफत उपलब्ध असलेल्या या सेवेमुळे, JioBharat फोन वापरकर्ते वार्षिक 1,500 रुपयांपर्यंत बचत करू शकतील.

जगातील सर्वात स्वस्त 4G फोन

JioBharat फोन सुमारे एक वर्षापूर्वी लाँच करण्यात आला होता आणि हा जगातील सर्वात परवडणारा 4G फोन मानला जात आहे. या फोनची किंमत फक्त 699 रुपये आहे. अशा प्रकारे, कोणताही व्यापारी नवीन JioBharat फोन खरेदी करून फोनची संपूर्ण किंमत केवळ 6 महिन्यांत वसूल करू शकतो. उद्या भारतात 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने Jio JioSoundPay वर आधुनिक संगीतासह वंदे मातरम सादर होणार आहे.

JIO ने लाँच केले नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन, इंटरनेट डेटा नाही तर मिळणार केवळ या सुविधा

जिओचे अध्यक्ष सुनील दत्त म्हणाले की, ‘तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक भारतीयाने सक्षम व्हावं यासाठी जिओ प्रयत्न करत आहे. 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना JioBharat वर मोफत JioSoundPay वैशिष्ट्य आणि वंदे मातरम सादर केलं जाणार आहे. आम्ही 26 जानेवारीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत आणि खऱ्या डिजिटल इंडियाच्या निर्मितीसाठी आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहोत.’

जिओने पुन्हा नवीन युजर्स जोडले

गेल्या वर्षी टेरिफ प्लॅनच्या किंमतीमध्ये झालेल्या वाढीनंतर अनेक युजर्सनी जिओची साथ सोडली. जिओ युजर्स कमी होत असतानाच बीएसएनएल युजर्समध्ये झपाट्याने वाढ झाली. सलग चार महिने ग्राहक गमावल्यानंतर, रिलायन्स जिओने नोव्हेंबरमध्ये वायरलेस वापरकर्ते जोडले. तर सरकारी कंपनी भारत संचार निगमने (बीएसएनएल) गेल्या चार महिन्यांत अनेक युजर्स गमावले. इतर खाजगी दूरसंचार कंपन्या – भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी देखील नोव्हेंबरमध्ये ग्राहक गमावले. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे.

Web Title: Tech news jio launch new feature on the occasion of republic day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.