JIO ने लाँच केले नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन, इंटरनेट डेटा नाही तर मिळणार केवळ या सुविधा
टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने टेलिकॉम कंपन्यांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या नियमांनुसार टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या युजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन लाँच करावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये कंपन्यांना युजर्सना केवळ कॉल्स आणि एसएमएस ऑफर करावे लागणार आहे. म्हणजेच ज्या युजर्सना इंटरनेट डेटाची गरज नाही, अशा युजर्ससाठी हे नवीन प्लॅन फायद्याचे ठरणार आहेत. आता देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेलने ट्रायच्या या नवीन नियमांचे पालन करत नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत.
फ्रीमध्ये OTT सबस्क्रिप्शन मिळवण्याची संधी! Flipkart करणार तुमची मदत, फक्त करा हे काम
TRAI च्या आदेशानंतर, जिओने आता त्यांच्या युजर्ससाठी नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना इंटरनेट डेटा मिळणार नाही. जिओने 458 रुपये आणि 1,958 रुपयांचे दोन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. 458 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. यामध्ये देशभरात मोफत अमर्यादित कॉलिंग आणि 1,000 मोफत एसएमएस मिळणार आहेत. यामध्ये मोबाईल डेटा दिलेला नाही. प्लॅनसह, तुम्हाला Jio Cinema आणि Jio TV ॲप्समध्ये प्रवेश मिळेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
ज्या युजर्सना केवळ कॉलिंग आणि एसएमएसची गरज आहे, अशा युजर्ससाठी हे प्लॅन अतिशय फायद्याचे ठरणार आहेत. त्याचप्रमाणे, 1,958 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांसाठी वैध असेल. यामध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग आणि एकूण 3,600 एसएमएस मिळतील. यामध्ये देखील मोबाईल डेटा दिला जात नाही. हे दोन्ही प्लॅन अशा युजर्ससाठी लाँच करण्यात आले आहेत, ज्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएसची गरज आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना इंटरनेट डेटा ऑफर केला जात नााही.
जिओप्रमाणे, एअरटेलने देखील फक्त दोन व्हॉईस प्लॅन सादर केले आहेत. कंपनी 509 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 900 एसएमएस देत आहे. तर 1,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस एक वर्षाच्या वैधतेसह मिळतील. या प्लॅनमध्ये देखील युजर्सना इंटरनेट डेटा ऑफर केला जात नाही.
टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायच्या आदेशानंतर जिओ आणि एअरटेलने फक्त व्हॉईस प्लॅन लाँच केले आहेत. अशा योजना दोन्ही कंपन्यांच्या वेबसाइटवर दिसत आहेत, ज्यामध्ये फक्त कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे दिले जातात. या निर्णयामुळे 2G वापरकर्त्यांसह अशा लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे ज्यांना डेटाची गरज नव्हती, परंतु आतापर्यंत त्यांना रिचार्ज प्लॅनमध्ये डेटाची किंमत मोजावी लागत होती. देशात अजूनही करोडो लोक आहेत जे मोबाईलचा डेटा वापरत नाहीत. अशा युजर्ससाठी कंपनीने हे नवीन नियम जारी केले आहेत.
दूरसंचार नियामकाने 23 डिसेंबर 2024 रोजी सर्व दूरसंचार कंपन्यांना व्हॉइस-ओन्ली रिचार्ज योजना सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी कंपन्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. आदेशात असे म्हटले आहे की, कंपन्यांना त्यांच्या सध्याच्या रिचार्ज प्लॅन्ससोबतच अशा योजना आणाव्या लागतील ज्यात फक्त व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे आहेत. ज्यांना डेटाची गरज नाही त्यांच्यासाठी अशा योजना आवश्यक आहेत.