तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही! 'उबर ॲप'वर मुंबई मेट्रोचे तिकीट (Photo Credit - X)
Uber ॲपवर मेट्रो तिकीटिंग उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना कमी प्रतीक्षा, कमी त्रास आणि अधिक सोयीस्कर प्रवास करणे शक्य होणार आहे. Uber इंडिया आणि दक्षिण आशियाचे (कन्झ्युमर ग्रोथ डायरेक्टर) शिवा शैलेन्द्रन यांनी सांगितले की, शहरी प्रवास पूर्णपणे ‘एंड-टू-एंड’ प्लॅनिंगपासून पेमेंट आणि प्रत्यक्ष प्रवासापर्यंत करण्याच्या आमच्या ध्येयातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. लक्षात ठेवा: मेट्रो तिकिटांसाठी पेमेंट फक्त यूपीआय (UPI) मार्फतच स्वीकारले जाणार आहे.
तिकिटिंग व्यतिरिक्त, Uber ॲपवर लवकरच प्रवाशांना खालील सुविधा उपलब्ध होणार आहेत:
ओएनडीसी नेटवर्कचे (Open Network for Digital Commerce) वरिष्ठ कार्यकारी संचालक नितीन नायर यांनी सांगितले की, ONDC नेटवर्कद्वारे Uber ॲपवर मेट्रो तिकीटिंग इंटिग्रेशन हे भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची (Digital Public Infrastructure) क्षमता दर्शवते. “दिल्ली आणि चेन्नईनंतर, आता मुंबईकरांसाठी Uber वर इन-ॲप मेट्रो तिकीटिंग उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी ओपन डिजिटल इकोसिस्टम आणखी मजबूत होईल,” असेही ते म्हणाले.






