Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्ले स्टोअरवर आढळलं हे बनावट सरकारी अ‍ॅप, तुम्ही तर डाऊनलोड केलं नाही ना! असा ओळखा खऱ्या आणि बनावट अ‍ॅपमधील फरक

गुगल प्ले स्टोअरवर मोठ्या प्रमाणात अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यापैकी काही बनावट अ‍ॅप्स आहेत, जे वेळोवेळी काढून टाकले जातात. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही अ‍ॅपची सत्यता तपासू शकता. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 05, 2025 | 11:38 AM
प्ले स्टोअरवर आढळलं हे बनावट सरकारी अ‍ॅप, तुम्ही तर डाऊनलोड केलं नाही ना! असा ओळखा खऱ्या आणि बनावट अ‍ॅपमधील फरक

प्ले स्टोअरवर आढळलं हे बनावट सरकारी अ‍ॅप, तुम्ही तर डाऊनलोड केलं नाही ना! असा ओळखा खऱ्या आणि बनावट अ‍ॅपमधील फरक

Follow Us
Close
Follow Us:
  • प्ले स्टोअरवर अनेक बनावट अ‍ॅप्स उपलब्ध
  • सरकारी अ‍ॅप असल्याचा दावा
  • अ‍ॅपबाबत सोशल मीडियावर प्रचंड चर्चा
अँड्रॉईड युजर्स गुगल प्ले स्टोअरवरून अनेक अ‍ॅप्स डाऊनलोड करत असतात. अनेकांना असं वाटतं की, प्ले स्टोअरवरील सर्ल अ‍ॅप्स खरे आहेत आणि युजर्सच्या सोयीसाठी तयार करण्यात आले आहेत. पण सत्य काही वेगळचं आहे. प्ले स्टोअरवर असे अनेक बनावट अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, जे युजर्सची फसवणूक करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. हे अ‍ॅप्स एखाद्या खऱ्या अ‍ॅपसारखे दिसतात. मात्र त्यामध्ये असे काही धोकादायक व्हायरस असतात जे युजर्सची फसवणूक करण्यासाठी तयार केलेले असतात. अशाच एका धोकादायक अ‍ॅपबाबात आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Apple Watch झाली आणखी स्मार्ट! WhatsApp चॅटिंग करण्यासाठी iPhone ची आवश्यकता संपली, जाणून घ्या सविस्तर

प्ले स्टोअरवर आढळलं बनावट सरकारी अ‍ॅप

अलीकडेच गुगल प्ले स्टोअरवर एक बनावट अ‍ॅप आढळला आहे, हा अ‍ॅप सरकारी असल्याचा दावा केला जात होता. Call History of any number असं या अ‍ॅपचं नाव आहे. हे अ‍ॅप सब्सक्रिप्शन प्लॅन खरेदी केल्यानंतर कोणत्याही नंबरची कॉल हिस्ट्री शेअर करण्याचा दावा करते. या अ‍ॅपबाबत सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. कारण हे अ‍ॅप आतापर्यंत लाखो लोकांनी डाऊनलोड केले आहे. अनेकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचे सबस्क्रीप्शन देखील खरेदी केली आहे. मात्र यानंतर युजर्सना कोणत्याही नंबरची कॉल हिस्ट्री शेअर करण्यात आली नाही. याशिवाय युजर्सना त्यांचे पैसे देखील परत दिले नाही. त्यामुळे आता या अ‍ॅपबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

Call History of any number हे अ‍ॅप सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात आले होते. आतापर्यंत लाखो लाोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे आणि प्ले स्टोअरवर या अ‍ॅपला 4.6 स्टार रेटिंग मिळाली आहे. या अ‍ॅपमध्ये तीन प्रकारचे सब्सक्रिप्शन प्लॅन ऑफर केले जात आहेत. ज्याची किंमत 274 रुपयांपसून सुरु होते. शेवटच्या प्लॅनची किंमत 462 रुपये आहे. तुम्ही देखील हे अ‍ॅप डाऊनलोड केले असेल तर त्वरीत लॉग आऊट करा.

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मने युजर्सना दिलं मोठं गिफ्ट! आता नंबरशिवायही करता येणार कॉल, लवकरच येणार जबरदस्त फीचर

अशी करा खऱ्या आणि खोट्या अ‍ॅप्सची ओळख

गुगल प्ले स्टोअरवर मोठ्या संख्येने अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यामध्ये काही नकली अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे. यातील काही अ‍ॅप्स खरे आहेत तर काही अ‍ॅप्स खोटे आहेत. आता युजर्स खऱ्या आणि खोट्या अ‍ॅप्स ओळख कशी करू शकतात, याबाबत आता आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.

  • एखादे अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी, त्याच्या डेव्हलपरची माहिती तपासा.
  • जर एखादे अ‍ॅप सरकारी मालकीचे असल्याचा दावा करत असेल, तर त्याच्या डेव्हलपरचे नाव आणि ते कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे ते तपासा.
  • कोणत्याही अनोळखी लिंकवरून अ‍ॅप डाऊनलोड करू नका.
  • कोणतेही सरकारी अ‍ॅप सेवांसाठी पैसे मागत नाही. जर सरकारी अ‍ॅप सबस्क्रिप्शन मागत असेल तर सावध रहा.

FAQs (संबंधित प्रश्न)

Google Play Store म्हणजे काय?
Google Play Store हा Android डिव्हाइसेससाठीचा अधिकृत अ‍ॅप स्टोअर आहे, जिथून वापरकर्ते अ‍ॅप्स, गेम्स, मूव्हीज, बुक्स आणि इतर डिजिटल कंटेंट डाउनलोड करू शकतात.

Google Play Store कोणी विकसित केला?
Google कंपनीने Play Store विकसित केला आहे, आणि तो Android सिस्टमचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Google Play Store मोफत आहे का?
हो, Play Store मोफत आहे. मात्र काही अ‍ॅप्स आणि गेम्समध्ये पेड व्हर्जन किंवा इन-ऍप खरेदी असते.

Web Title: Tech news marathi fake government app found on google play store how to recognize fake and real apps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 11:38 AM

Topics:  

  • google
  • google play store
  • Tech News

संबंधित बातम्या

भारताचे पहिले पगारदार-केंद्रित क्रेडिट कार्ड लॉन्च, सॅलरीसे आणि सिटी युनियन बँकेचा उपक्रम
1

भारताचे पहिले पगारदार-केंद्रित क्रेडिट कार्ड लॉन्च, सॅलरीसे आणि सिटी युनियन बँकेचा उपक्रम

ChatGPT ने दिलं सीक्रेट ख्रिसमस गिफ्ट! फक्त एक ईमोजी आणि सांताक्लॉज स्वत: बनवणार तुमचा व्हिडीओ, नवं अपडेट पाहून यूजर्स खूश
2

ChatGPT ने दिलं सीक्रेट ख्रिसमस गिफ्ट! फक्त एक ईमोजी आणि सांताक्लॉज स्वत: बनवणार तुमचा व्हिडीओ, नवं अपडेट पाहून यूजर्स खूश

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग
3

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

Tech Tips: फोनवरच अडकलंय आयुष्य? फक्त या 5 सवयी बदला… 72 तासांत तुम्हालाही दिसेल चकित करणारा फरक
4

Tech Tips: फोनवरच अडकलंय आयुष्य? फक्त या 5 सवयी बदला… 72 तासांत तुम्हालाही दिसेल चकित करणारा फरक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.