तुमच्या स्मार्टफोनधील हे फेक लोन ॲप्स आत्ताच डिलीट करा! नाहीतर पश्चाताप कराल
McAfee ने 15 फेक लोन ॲप्सची यादी जारी केली आहे. हे ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले असल्याचं कंपनीने म्हटले आहे. पण हे ॲप्स अजूनही काही लोकांच्या फोनमध्ये आहेत. हे ॲप्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. हे ॲप्स तुमच्या डिव्हाइसमध्ये असतील तर तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात येऊ शकते. म्हणून, त्यांना त्वरित डिलीट करणं गरजेचं आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
फेक लोन ॲप डाउनलोड करण्याच्या बाबतीत भारतीय वापरकर्ते पहिल्या स्थानावर आहेत, असं स्टेटमेंट आतापर्यंत अनेक टेक दिग्गजांनी शेअर केलं आहे. आता हे स्टेटमेंट खर होताना दिसत आहे. कारण असे अनेक जण आहेत, जे कोणतेही रिव्ह्यु किंवा ॲपबद्दल कोणतीही माहिती न वाचता ते ॲप आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करतात. McAfee च्या अलीकडील अहवालानुसार, नवीन ॲप इंस्टॉल करण्यापूर्वी, बहुतेक वापरकर्ते ॲपबद्दल कोणतेही संशोधन करत नाहीत. गेल्या काही महिन्यांत बनावट लोन ॲप्सने अनेकांना अडकवले आहे. फेक लोन ॲपस्मुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक ॲप्स उपलब्ध आहेत, जे कोणत्याही पडताळणीशिवाय कर्ज देण्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात त्यांचा सत्याशी काहीही संबंध नाही. लोकांना घोटाळ्यात अडकवण्याचे हे एक साधन आहे. बनावट लोन ॲप्सबद्दल लोकांना सावध करण्यासाठी मॅकॅफीने एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये त्या ॲप्सबद्दल सांगितले आहे जे कर्ज देण्याचा दावा करतात, पण प्रत्यक्षात ते लोकांची फसवणूक करत असतात. या ॲप्सचा उद्देश घोटाळे करणे हा आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अहवालानुसार, बनावट कर्ज ॲप्स वापरकर्त्याचे वैयक्तिक आणि बँक तपशील चोरतात, त्यानंतर त्यांचा गैरवापर केला जातो. संगणक सुरक्षा प्रदान करणाऱ्या कंपनीने म्हटले आहे की काही बनावट लोन ॲप्स आहेत जे 8 दशलक्षाहून अधिक लोकांनी इंस्टॉल केले आहेत. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या 15 बनावट कर्ज ॲप्सपैकी तुमच्या फोनमध्ये एखादे ॲप असल्यास ते त्वरित डिलीट करणे गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला देखील मोठ्या फसवणुकीला सामोरं जावं लागू शकत.
यापैकी काही फेक लोन ॲप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे, मात्र त्यानंतरही काही युजर्सच्या फोनमध्ये हे ॲप्स इन्स्टॉल झाले आहेत.
McAfee ने बनावट कर्ज ॲप्सची यादी जारी केली आहे जे तुमचे कॉल, मेसेज, कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशन यासारख्या तपशीलांमध्ये प्रवेश करू शकतात. तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो.
यासोबतच गुगलने नुकतेच युजर्सना ऑनलाइन घोटाळे आणि सायबर फसवणुकीबाबत चेतावणी दिली आहे. लोकांना अडकवण्यासाठी घोटाळेबाज विविध युक्त्या वापरतात. त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.