X लॉगआऊट केलं, आता Bluesky वर अकाउंट तयार करायचय? या सोप्या स्टेप्स तुम्हाला करतील मदत
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X युजर्सची संख्या कमी होत असून Bluesky युजर्सची संख्या वाढत आहे. अमेरिका निडणुकीनंतर अनेक युजर्सने त्यांचं x अकाउंट लॉग आऊट केलं आणि Bluesky वर अकाउंट तयार केलं. परिणामी x युजर्सची संख्या कमी झाली आणि Bluesky युजर्सची संख्या झपाट्याने वाढली. Bluesky देखील x प्रमाणेच एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अमेरिका निवडणुकीत x चा मालक असलेल्या Elon Musk ने डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काही तासांतच 1 दशलक्षाहून अधिक लोकांनी BlueSky वर त्यांचे अकाउंट तयार केले आणि अनेकांनी त्यांचं x अकाउंट लॉग आऊट केलं. आता तुम्हालाही Bluesky या सोशल प्लॅटफॉर्मवर अकाउंट तयार करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Bluesky जॅक डोर्सीच्या मालकीचे आहे. गेल्या काही दिवसांत प्लॅटफॉर्मने दहा लाखांहून अधिक वापरकर्ते जोडले आहेत आणि संख्या वाढतच आहे. विशेषतः ट्रम्प यांच्या निवडणूक विजयानंतर Bluesky च्या फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
BlueSky हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे युजर्सना 300 शब्दांपर्यंत छोटे मॅसेज, इमेज, व्हिडिओ पोस्ट करण्यास आणि डायरेक्ट मॅसेज सेंड करण्यास परवानगी देतो. BlueSky अनेक बाबतीत X प्रमाणेच कार्य करते. तथापि, काही प्रकरणांमध्ये त्यांच्यात फरक आहे. येथे प्रमाणे तुम्हाला फक्त तोच मजकूर दिसेल जो तुम्ही फॉलो करत आहात किंवा तुम्हाला माहीत आहे. तर X वर असे नाही. X तुमच्यासाठी आणि फॉलोइंग टॅब ऑफर करतो, जेथे कोणत्याही प्रकारचा कंटेंट दिसू शकतो.






