Telegram युजर्सना मिळणार हे नवीन फीचर्स, App वापरण्याचा अनुभव होणार अधिक मजेदार
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामचे करोडो अॅक्टिव्ह युजर्स आहेत. आपल्या मित्रांसोबत चॅटिंग करण्यापासून नवीन सिनेमे पाहण्यापर्यंत टेलिग्राम तुम्हाला अनेक फीचर्स ऑफर करते. आता देखील टेलिग्रामने त्यांच्या युजर्ससाठी एक दोन नव्हे तर तब्बल 6 फीचर्स रिलीज केले आहेत. या नवीन फीचर्समुळे युजर्सचा टेलिग्राम वापरण्याचा अनुभव अधिक मजेदार होणार आहे. याबाबत घोषणा करण्यात आली असून हे नवीन फीचर्स युजर्ससाठी एक वेगळा अनुभव घेऊन येणार आहेत.
भारतीय रेल्वेने लाँच केले ‘सुपर ॲप’, प्रवाशांना मिळणार हे फायदे! अशा प्रकारे करा डाऊनलोड
टेलिग्रामने रिलीज केलेले हे नवीन फीचर्स युजर्सचा गिफ्टिंग अनुभव आणखी सुधारणा करू शकतात. या अपडेट्सचा एक भाग म्हणून, वापरकर्ते आता कलेक्टिबल गिफ्ट्स इमोजी स्टॅच्यूज म्हणून प्रदर्शित करू शकतात, त्यांना ब्लॉकचेनवर ट्रांसफर करू शकतात आणि त्यांचा लिलाव देखील करू शकतात. याशिवाय वापरकर्ते आता टेलीग्राम स्टोरीजद्वारे त्यांच्या कलेक्टिबल गिफ्ट्स शेअर देखील करू शकतात. यावर्षात कंपनीने लाँच केलेले हे दुसरे मोठे अपडेट आहे. 1 जानेवारी रोजी देखील कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी काही फीचर्स लाँच केले होते. ज्यामध्ये ॲपमधील QR कोड स्कॅनर,सर्विस मॅसेज रिएक्शंस, फोल्डरच्या नावांमधील इमोजी, एडवांस सर्च फिल्टर्स आणि इतर अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कलेक्टिबल गिफ्ट्सना इमोजी स्टेटस म्हणून प्रदर्शित करता येणार – टेलीग्राम वापरकर्ते आता त्यांच्या कलेक्टिबल गिफ्ट्स इमोजी स्टेटस म्हणून दाखवू शकतात. जेव्हा हे नवीन फीचर वापरले जाईल, तेव्हा एक चमकणारा स्टार इफेक्ट दिसेल आणि गिफ्टच्या बॅकग्राउंड आणि सिंबॉलनुसार वापरकर्त्याच्या प्रोफाइलचे स्वरूप बदलेल. हे फीचर My Profile > Gifts द्वारे चालू किंवा बंद केले जाऊ शकते.
ब्लॉकचेनवर गिफ्ट्स ट्रांसफर आणि लिलाव – टेलिग्राम आता वापरकर्त्यांना TON ब्लॉकचेनद्वारे कलेक्टिबल गिफ्ट्स ट्रांसफर किंवा लिलाव करण्यास अनुमती देते. कंपनीने सांगितलं आहे की यामुळे वापरकर्त्यांनी त्यांचे अकाऊंट गमावले किंवा डिलीट केले तरीही त्यांच्या भेटवस्तूंवर त्यांना कायमचे नियंत्रण मिळेल. TON वॉलेटमध्ये भेटवस्तू ट्रांसफर केल्याने वापरकर्त्यांना विविध लिलाव साइट किंवा प्लॅटफॉर्म ऑफर केलेले अतिरिक्त फायदे देखील प्रदान करू शकतात.
चॅनेलवर गिफ्ट पाठवण्याची सुविधा मिळणार – टेलिग्राम आता वापरकर्त्यांना चॅनेलवर गिफ्ट पाठवण्याची परवानगी देत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या फीचरचा वापर चॅनेल्समधील कोणतीही महत्त्वाची कामगिरी किंवा विशेष प्रसंग साजरा करण्यासाठी केला जाऊ शकतो. या भेटवस्तू चॅनेलच्या प्रोफाइलवर दिसतील आणि स्टार्सद्वारे अपग्रेड केल्या जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, चॅनेल ओनर्स या भेटवस्तू इतर वापरकर्ते आणि चॅनेलला ट्रांसफर करू शकतात किंवा ब्लॉकचेनवर त्यांचा लिलाव देखील करू शकतात.
टेलीग्राम स्टोरीजवर कलेक्टिबल गिफ्ट्स शेअर करा – टेलिग्राम वापरकर्ते आता त्यांच्या कलेक्टिबल गिफ्ट्स टेलिग्राम स्टोरीज म्हणून शेअर करू शकतात. या भेटवस्तू ॲनिमेटेड प्रीव्यूच्या स्वरूपात दिसतील, ज्यामुळे त्या इतर युजर्सना अगदी सहज आकर्षित करतील.
गिफ्ट्स फिल्टर करण्यासाठी नवीन पर्याय – टेलिग्रामच्या नवीन अपडेटमध्ये, गिफ्ट्स टॅबमध्ये एक फिल्टरिंग वैशिष्ट्य जोडले गेले आहे, ज्याद्वारे वापरकर्ते त्यांचे गिफ्ट्स कलेक्टिबल स्टेटस, रिसिव्ह डेट आणि किंमत यांच्या आधारे सॉर्ट करू शकतात.
चॅनल एडमिन्ससाठी गिफ्ट्ससंबंधित नोटिफिकेशन- चॅनल एडमिन्स आता त्यांच्या चॅनेलद्वारे मिळालेले गिफ्ट्स ट्रॅक करण्यासाठी नोटिफिकेशन टॉगलचा वापर करू शकतात.