फोटो सौजन्य - Social Media
भारतीय रेल्वेने त्यांच्या प्रवाशांच्या सोयीसाठी एक नवीन सुपर ॲप लाँच केले आहे. रेल्वेने SWAREL हे बहुप्रतिक्षित ॲप लाँच केले आहे. नवीन ॲप प्रवाशांसाठी प्रचंड फायद्याचे ठरणार आहे, कारण या एका ॲपमध्ये युजर्सना अनेक सुविधा मिळणार आहेत. SWAREL हे प्रवाशांना अनेक रेल्वे सेवांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन देईल. SWAREL सुपर ॲप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (CRIS) ने विकसित केले आहे. या सुपर ॲपची बीटा आवृत्ती आता अँड्रॉईड युजर्ससाठी Google Play Store आणि आयफोन युजर्ससाठी Apple App Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. प्रवाशांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर आता एका सुपर ॲपमध्ये मिळणार आहेत.
Google Photos दिसणार नव्या अंदाजात! डेस्कटॉप वर्जनमध्ये आलं नवीन अपडेट, Image Flip सह करा फोटो एडीट
‘SWAREL’ रेल्वेच्या विविध सेवांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करते, ज्यामुळे प्रवाशांसाठी त्यांचा प्रवास मॅनेज करणं अधिक सोपं होतं. विद्यमान वापरकर्ते त्यांचे RailConnect आणि UTSonMobile क्रेडेन्शियल वापरून लॉग इन करू शकतात. यासह, युजर्स युनिफाइड अकाऊंटद्वारे अनेक सेवांमध्ये प्रवेश करू शकतील. SWAREL बाबत भारतीय रेल्वेनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
CRIS द्वारे विकसित केलेले हे सुपर ॲप भारतीय रेल्वेच्या सर्व पब्लिक-फेसिंग ऐप्लिकेशन्सना एकाच प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करते. ॲप वापरकर्त्याच्या विविध गरजा पूर्ण करतो, ज्यामुळे युजर्सचा प्रवास अधिक सुखाचा होतो.
Dear User,
Your wait is over!! Indian Railways 🚂 is offering its SuperApp 📲 for Beta Test.
💎 The Indian Railways – SuperApp is a one-stop solution offering multiple public facing services of Indian Railways.
— Centre For Railway Information Systems (@amofficialCRIS) January 31, 2025
💎 You can download the App from Playtore and Appstore:
⚙️PlayStore: https://t.co/yfRAUum1uF
⚙️AppStore: https://t.co/MD28tq0bZl
💎 The App is available for download on First Come First Serve basis. ⏳
— Centre For Railway Information Systems (@amofficialCRIS) January 31, 2025
सोशल मीडियावर ॲप लाँच केल्याची घोषणा करताना CRIS म्हणाले, ‘प्रिय ग्राहकांनो, तुमची प्रतीक्षा संपली आहे! भारतीय रेल्वेने बीटा चाचणी अंतर्गत आपले सुपर ॲप लाँच केले आहे. हे ॲप विविध रेल्वे सेवांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून काम करते. ज्यामुळे युजर्सना बराच फायदा होऊन त्यांचा प्रवास देखील अधिक सुखकर होतो.
बीटा आवृत्ती सध्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर उपलब्ध आहे. इच्छुक वापरकर्ते खालील लिंक वापरून ॲप डाउनलोड करू शकतात:
प्ले स्टोअर: https://play.google.com/apps/testing/org.cris.aikyam
ॲप स्टोअर: https://testflight.apple.com/join/aWFYt6et
बीटा आवृत्तीची चाचणी करणारे प्रवासी swarrail.support@cris.org.in वर ईमेल करून त्यांचा अभिप्राय थेट CRIS ला देऊ शकतात. पूर्ण-प्रमाणात रोलआउट करण्यापूर्वी वापरकर्त्यांकडील इनपुट ॲपमध्ये सुधारणा करण्यात मदत करेल. ॲप आपल्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर त्यातील कोणते अपडेट चांगले आहेत आणि कोणत्या अपडेटमुळे युजर्सना मनस्ताप होऊ शकतो, याबद्दल तुम्ही CRIS ला माहिती देऊ शकता.