ChatGPT down: AI चॅटबोट चॅटपीजीटी डाऊन, नेटकरी अस्वस्थ! काय आहे नेमकं कारण?
ChatGPT down: टेक कंपनी ओपनएआयचे लोकप्रिय AI चॅटबोट चॅटजीपीटी डाऊन झाले आहे. चॅटबॉट चॅटजीपीटी अचानक बंद झाल्याने युजर्स प्रचंड हैराण झाले. भारतीय वेळेनुसार सकाळी 5:30 वाजता चॅटजीपीटी डाऊन झाले आहे. यामुळे, लोक ChatGPT आणि कंपनीची नवीन सेवा सोराचा वापर करण्यास सक्षम नव्हते.
Year Ender 2024: 2024 मध्ये इंस्टाग्रामवर भारतीयांचा जलवा, Meta ने शेअर केल्या खास गोष्टी
डाउनडिटेक्टर सारख्या वेबसाइटनुसार, 74 टक्के लोकांना ChatGPT वापरण्यात समस्या येत आहेत, तर 16 टक्के लोकांना वेबसाइट वापरण्यात समस्या येत आहेत आणि 10 टक्के लोकांना ॲप वापरण्यात समस्या येत आहेत. यासंबंधित युजर्सनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर मिम्स शेअर करत ओपनएआय आणि चॅटजीपीटीला टॅग केलं आहे. तसेच ओपनएआयने त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत या आउटेजबद्दल माहिती दिली आहे. मात्र ही समस्या कशामुळे निर्माण झाली, याचं नेमकं कारण काय आहे, याबद्दल कंपनीने माहिती दिली नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
जेव्हा युजर्सनी ChatGPT मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना एक त्रुटी संदेश प्राप्त झाला की सेवा तात्पुरती खंडीत आहे. OpenAI ने समस्या मान्य केली आणि वापरकर्त्यांना आश्वासन दिले की त्याची टीम सेवा ChatGPT ची पूर्वपदावर आणण्यासाठी काम करत आहे.
Meta apps down: मेटाचे सोशल मीडिया ॲप्स डाऊन, युजर्स हैराण! एक्सवर मीम्सचा पाऊस
OpenAI कंपनीने ही समस्या मान्य केली आहे आणि त्याबद्दल X वर पोस्ट केले आहे. कंपनीने पोस्ट केले, ‘ChatGPT युजर्स सध्या समस्येचा सामना करत आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
We’re experiencing an outage right now. We have identified the issue and are working to roll out a fix.
Sorry and we’ll keep you updated!
— OpenAI (@OpenAI) December 12, 2024
तसेच आता कंपनीची सेवा पूर्वपदावर आली असून याबाबत देखील कंपनीने पोस्ट शेअर करत त्यांच्या युजर्सना अपडेट दिलं आहे.
ChatGPT, API, and Sora were down today but we’ve recovered. https://t.co/OKiQYp3tXE
— OpenAI (@OpenAI) December 12, 2024
अनेक वापरकर्त्यांनी X वर या समस्येवर मजेदार पोस्ट शेअर केले. काही लोकांनी लिहिले, ‘Chatgpt, तुम्ही सर्वात वाईट वेळी बंद केले.’
#ChatGPT is down. Looks like everyone will have to finish their assignments the old fashioned way. pic.twitter.com/68xVq9DNf8
— Xon Kurama (@XonKurama) December 12, 2024
chatgpt this is the actual worst time you could have chosen to be down pic.twitter.com/JUYS0q7pEy
— ✩ (@heartfuljm) December 11, 2024
Students who have assignments due tomorrow are absolutely shitting themselves. #chatgptdown #chatgpt pic.twitter.com/YzZtdKKp3w
— Ryan Hanly (@ryanhanly) December 12, 2024
Me trying to remember how I did my assignment before ChatGPT so I can finish my assignment #ChatGPTdown #ChatGPT pic.twitter.com/c1rMyqfITe
— cool (@JJ393064) December 12, 2024