लाँचिंगपूर्वी Samsung Galaxy F16 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक, बजेट फ्रेंडली रेंजमध्ये करणार एंट्री
सॅमसंग नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी बजेट फ्रेंडली आणि प्रिमियम असे दोन्ही स्मार्टफोन्स लाँच करत असते. नुकताच सॅमसंगने त्यांच्या ग्राहकांसाठी प्रिमियम रेंजमधील Samsung Galaxy S25 सिरीज लाँच करण्यात आली होती. या सिरीजनंतर आता कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. लवकरच सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F16 भारतात लाँच केला जाऊ शकतो. जरी कंपनीने अद्याप या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली नसली तरी येत्या काही दिवसांतच हा स्मार्टफोन भारतात एंट्री करण्याची शक्यता आहे.
भारतात लाँच होण्यापूर्वी Samsung Galaxy F16 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. एका टिपस्टरने स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमत लीक केली आहे, ज्यामध्ये हा आगामी स्मार्टफोन मीडियाटेक डाइमेंशन 6300 चिपसेट आणि 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपद्वारे समर्थित असल्याचे म्हटले आहे. हा स्मार्टफोन Galaxy A16 5G चा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो, जो बजेट स्मार्टफोन मार्केटमध्ये एक उत्तम पर्याय असू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
टिपस्टर देबायन रॉय (@Gadgetsdata) यांनी यापूर्वी त्यांच्या एक्स अकाऊंटवर Galaxy F16 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन शेअर केले होते. टिपस्टर देबायन रॉयने म्हटलं आहे की, भारतात Samsung Galaxy F16 ची किंमत 15,000 रुपये असू शकते. कारण, Galaxy A16 ची किंमत ऑक्टोबर 2024 मध्ये 15,000 रुपयांपासून सुरू झाली होती, तर त्याच्या 8GB / 128GB व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये होती. हे नवीन डिव्हाइस बजेट स्मार्टफोन म्हणून लाँच केले जाऊ शकते, जे उत्तम वैशिष्ट्यांसह आणि परवडणाऱ्या किमतीसह येईल.
Galaxy F16 (SM-E166P/DS) India 🇮🇳 launch – February.
Galaxy F16 Specs :
• MTK Dimensity 6300 (6nm)
📱6.7″ FHD+ 90Hz Amoled
📸 50MP + 5MP UW + useless
🤳 13MP,⚡25W charging
• Upto 8GB LPDDR4X RAM, UFS 2.2Basically Galaxy A16 at lower price, under ₹15,000 .
— Debayan Roy (Gadgetsdata) (@Gadgetsdata) February 5, 2025
Galaxy F16 मध्ये 6.7-इंचाचा फुल HD+AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येईल. हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या 6nm डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर आणि 8GB रॅमने सुसज्ज असेल.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50 एमपीचा मुख्य कॅमेरा, 5 एमपीचा अल्ट्रा वाइड-अँगल कॅमेरा आणि दुसरा तिसरा सेन्सर असेल. हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली आहे आणि तरीही उत्तम कामगिरी आणि कॅमेरा वैशिष्ट्ये देण्याचे आश्वासन देतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, Samsung Galaxy F16 मध्ये 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देऊ शकतो.
हा आगामी स्मार्टफोन 25W पर्यंत जलद वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करू शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, Galaxy A16 मध्येही हेच स्पेसिफिकेशन देण्यात आले आहे.
फ्लिपकार्टने अलीकडेच भारतात एक नवीन गॅलेक्सी एफ-सिरीज स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे, जो कदाचित Galaxy F16 5G असू शकतो. सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर मॉडेल क्रमांक SM-E166P/DS सह Galaxy F16 चे सपोर्ट पेज देखील लाईव्ह झाले आहे.हा स्मार्टफोन पूर्वी वाय-फाय अलायन्स डेटाबेसमध्ये देखील दिसला होता, ज्यामध्ये ड्युअल-बँड वाय-फाय कनेक्टिव्हिटीचा उल्लेख होता. हे आगामी डिव्हाईस उत्तम कनेक्टिव्हिटी आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांसह बाजारात येण्यास सज्ज आहे.