Samsung घेऊन येतोय आतापर्यंतचा सर्वात स्लिम Smartphone! फ्लॅट डिझाईनसह मिळणार हे फीचर्स
22 जानेवारी रोजी Samsung Unpacked Event आयोजित करण्यात आला होता. या ईव्हेंटमध्ये कंपनीने फ्लॅगशिप Galaxy S25 सीरीज लाँच केली आहे. या वर्षीही कंपनीने 3 स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. ज्यामध्ये Galaxy S25 Ultra, Galaxy S25+ आणि S25 यांचा समावेश आहे. याशिवाय हे स्मार्टफोन AI आणि अनेक अपग्रेड फीचर्सने सुसज्ज आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेले Galaxy S25 Ultra, Galaxy S25+ आणि S25 स्मार्टफोन्स काल Samsung Unpacked Event मध्ये लाँच करण्यात आले. ईव्हेंटनंतर कंपनीने आणखी एका नवीन स्मार्टफोनचा टिझर शेअर केला आहे.
iPhone की Pixel? iPhone 17 चं डिझाईन लिक, मिळणार Pixel सारखा रियर कॅमेरा मॉड्यूल?
कंपनीने Samsung Unpacked Event नंतर Galaxy S25 Edge चा टीझर रिलीज केला आहे. हा कंपनीचा सर्वात स्लिम डिझाईन असलेला स्मार्टफोन असणार आहे. मात्र हा स्मार्टफोन कोणत्या नावाने लाँच केला जाणार याबाबत काही प्रमाणात शंका आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेप्रमाणे नवीन स्लिम स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Slim या नावाने लाँच होणार होता. मात्र आता समोर आलेल्या अपडेटनुसार Samsung Galaxy S25 Slim हा अधिकृतपणे Galaxy S25 Edge म्हणून लाँच केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. टीझरमध्ये दिसणाऱ्या पहिल्या झलकमध्ये स्मार्टफोनची फ्लॅट डिझाईन दिसत आहे. तसेच, मागील बाजूस 2 कॅमेरे दिसत आहेत. (फोटो सौजन्य – X)
मात्र, फोनचा टीझर रिलीज झाल्यानंतर अफवांचा बाजारही सुरु झाला आहे. त्यानुसार, Galaxy S25 Edge मध्ये Snapdragon 8 Elite chipset, 12GB RAM आणि दोन रियर कॅमेरे असण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये पेरिस्कोप लेन्स असू शकते. फोनमध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध असेल.
Really Galaxy S25 Edge😳?#GalaxyS25Edge #GalaxyS25 #GalaxyS25Ultra #GalaxyS25Series #GalaxyUnpacked #GalaxyAI pic.twitter.com/EEiuanWkIF
— Abhinav Ranjan Jha (@digidoty) January 22, 2025
कंपनीला फोन लाँच करण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो, अशी मााहिती समोर आली आहे. त्यामुळे या सर्वात स्लिम स्मार्टफोनची लाँच डेट अद्याप समोर आली नाही. तर इतर तीन S25 फोन 7 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. S25 Edge मे पासूनच विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन कंपनी भारतात लाँच करणार की नाही हे सध्या स्पष्ट झालेले नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की Apple सप्टेंबरमध्ये iPhone 17 लाँच करण्याच्या तयारीत आहे, जो खूप पातळ असू शकतो. ॲपलला टक्कर देण्यासाठी सॅमसंग हा फोनही त्याच वेळी किंवा त्यापूर्वी बाजारात आणण्याची शक्यता आहे.
Galaxy S25 Edge मध्ये 6.9 इंचाचा मोठा डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे. या नवीन स्लिम स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सर आणि ड्युअल टेलीफोटो लेन्ससह अपग्रेड केलेला कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच यामध्ये एडवांस थर्मल मॅनेजमेंटसह नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट असू शकतो.