फायनली! सॅमसंग युजर्सना मिळालं One UI 7 बीटा अपडेट, AI फिचर्ससह मिळणार नवीन अनुभव
सॅमसंग यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. सॅमसंग one UI 7 बीटा अपडेट रोल आऊट करण्यात आल आहे. काही दिवसांपूर्वीच सॅमसंग one UI 7 बीटा अपडेटची रिलिज डेट जाहीर करण्यात आली होती. त्यांनतर आता हे अपडेट रोल आऊट करण्यात आलं आहे. अपडेटमध्ये युजर्सना AI फिचर्ससह नवीन अनुभव मिळणार आहे. युजर्सचा फोन वापरण्याचा अनुभव आता बदलणार आहे.
POCO चे हे दोन स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच! प्रिमियम डिझाईनसह मिळणार हटके फीचर्स
सॅमसंग one UI 7 बीटा अपडेट काही निवडक युजर्ससाठी रोल आऊट झालं आहे. हे अपडेट सर्वांसाठी कधी रिलिज होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
दीर्घ प्रतीक्षेनंतर, Galaxy स्मार्टफोन्ससाठी रोल आऊट करण्यात आलेल्या One UI 7 बीटा अपडेटमध्ये सॅमसंग विजेट्स, ॲप आयकॉन आणि व्हर्टिकल ॲप ड्रॉवरसाठी नवीन फीचर्स ऑफर करण्यात आले आहे. त्यात काही नवीन UI एलिमेंट्स देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच, कॅमेरा नियंत्रणे पूर्वीपेक्षा चांगली झाली आहेत. अपडेटमध्ये कोणती वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत आणि वापरकर्त्यांचा अनुभव कसा सुधारणार आहे, याबद्दल जाणून घेऊया.
One UI 7 बीटा भारत, जर्मनी, दक्षिण कोरिया, यूएस, यूके आणि पोलंडमधील वापरकर्त्यांसाठी 5 डिसेंबरपासून रोलआउट झाला आहे. सध्या, फक्त Galaxy S24 सिरीज स्मार्टफोन्सना नवीन अपडेट प्राप्त झाले आहे. तुम्हाला अपडेटमध्ये मिळालेल्या नवीन वैशिष्ट्यांचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला सॅमसंग बीटा प्रोग्राममध्ये नोंदणी करावी लागेल. Galaxy S25 लाँच झाल्यानंतर इतर Galaxy फोनसाठी अपडेट रोल आउट केले जाऊ शकते. पण अद्याप कंपनीने अधिकृतपणे काही सांगीतले नाही.
व्हर्टिकल ॲप ड्रॉवर – नवीन बीटा अपडेटमध्ये एक बिल्ट-इन-ऑप्शन मिळाला आहे, OneUI ॲप ड्रॉवरच्या बॉटम राइट कॉर्नरला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करून अल्फाबेटिकल ऑर्डर निवडला जाऊ शकतो.
लाईव्ह नोटिफिकेशन – लॉकस्क्रीनच्या बॉटमला एक ‘बार’ जोडण्यात आला आहे. यात म्युझिक प्लेयर, घड्याळ, नकाशा आणि सॅमसंग हेल्थच्या लाईव्ह नोटिफिकेशन मिळणार आहेत.
बुलेट पॉईंट कंटेंट – अपडेटमध्ये अॅडवांस राइटिंग टूल्स समाविष्ट आहेत जी तुम्हाला Galaxy AI च्या मदतीने बुलेट पॉईंट कंटेंटचा सारांश बनविण्यास अनुमती देतात.
Galaxy AI वापरकर्त्यांना 20 भाषांमध्ये ऑटोमॅटिक कॉल ट्रान्सक्रिप्शन देत असून, कॉल ट्रान्स्क्रिप्ट वैशिष्ट्य देखील अपडेटसह पदार्पण करते.
Krafton ने लाँच केला ‘कुकी रन इंडिया’, ऑनलाईन गेमिंग आता होणार अधिक मजेदार
नवीन आयकॉन – कॅमेरा, कॅल्क्युलेटर आणि गॅलरी सारख्या ॲप्सना नवीन आयकॉन मिळाले आहेत. कंपनीने बॅटरीची स्थिती आणि घड्याळासाठी नवीन विजेट्स देखील आणले आहेत.
बॅटरी इंडिकेटर आणि ऑल-ऑन-डिस्प्लेसह चार्जिंग इंडिकेटर, क्विक सेटिंग यांसारखी वैशिष्ट्ये स्टेटस बारमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय चार्जिंग ॲनिमेशनमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.
आता कमाल बॅटरी प्रोटेक्शन सेटिंग 80 टक्के, 85 टक्के, 90 टक्के आणि 95 टक्के सेट केली जाऊ शकते. कॅमेरा ॲपमध्ये अनेक कॅमेरा बटणे, कंट्रोल आणि मोड समाविष्ट केले आहेत. यात ग्रॅन्युलर झूम कंट्रोल आणि प्रो-प्रो व्हिडिओ मोड आहे.