Krafton ने लाँच केला 'कुकी रन इंडिया', ऑनलाईन गेमिंग आता होणार अधिक मजेदार
स्मार्टफोन गेम BGMI च्या लोकप्रियते बद्दल काही वेगळ सांगण्याची गरज नाही. BGMI भारतात प्रचंड लोकप्रीय आहे. अनेक गेमर्स BGMI च्या मदतीने लाखो रुपये कमावत आहेत. अशातच आता BGMI निर्माता Krafton India ने आपला गेमिंग पोर्टफोलिओ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. BGMI नंतर आता कंपनीने आणखी एक नवीन ऑनलाइन गेम लाँच करण्याचं ठरवलं आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
BGMI च्या लोकप्रियतेनंतर, कंपनीने गेमर्सचा अनुभव मजेदार बनवण्यासाठी ‘कुकी रन इंडिया’ हा गेम लाँच केला आहे . याशिवाय, Krafton ने 2025 चे भविष्यातील नियोजन देखील जाहीर केले आहे. कॅज्युअल रनर मोबाईल गेम कुकी रन इंडिया 11 डिसेंबरपासून Google Play Store आणि Apple App Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पब्लिक बीटामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच, गेमला 10 लाखांहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन मिळाली आहेत. भारतीयांना डोळ्यासमोर ठेवून कंपनीने हा गेम लाँच करण्यात आला आहे. यामध्ये जागतिक स्तरावर लोकप्रिय ‘कुकी रन’ सिरीज तसेच स्थानिक आणि सांस्कृतिक अनुभवांचा समावेश असेल. तसेच, गुलाब जामुन आणि काजू कटली या मिठाईंसारखी पात्रे गेममध्ये ऑफर केली गेली आहेत. कंपनी गेमर्सना काही अनोखे एलिमेंट्स आणि गेममधील स्थानिक इव्हेंट देखील ऑफर करते. ज्यामुळे गेमिंगचा अनुभव अधिक मजेदार होतो.
Krafton India 2024 भारतासाठी खूप मजेदार ठरले आहे. पुढील वर्षी 2025 मध्ये देखील कंपनी 3-4 नवीन गेम लाँच करण्याचा विचार करत आहे. या वर्षी, कंपनीचा सर्वात लोकप्रिय गेम BGMI ने 20 कोटींहून अधिक वेळा डाउनलोडचा टप्पा ओलांडला आहे. eSports व्ह्यूअरशिपमध्येही नवीन विक्रम केले गेले आहेत. त्यामूळे Krafton India साठी 2024 चं वर्ष अविस्मरणीय ठरणार आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कंपनी भारतात बुलेट इको इंडिया गेम देखील ऑफर करत आहे. याशिवाय कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला गरुड सागा गेम आणला होता, जो भारतीय थीमवर आधारित आहे. यामध्ये गोळ्या, बंदुका, बारूद किंवा बॉम्बऐवजी धनुष्यबाणाचा वापर करण्यात आला आहे. हा गेम क्राफ्टन इंडियाने डेव्हसिस्टर्सच्या सहकार्याने विकसित केला आहे.