Maha Kumbh 2025: महाकुंभाच्या संगममध्ये स्नान करण्यासाठी येणार 'Steve Jobs' ची पत्नी, 17 दिवस राहणार कल्पवासात
उत्तर प्रदेशात असणाऱ्या प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. 13 जानेवारीपासून कुंभमेळ्याला सुरुवात होणार असून 26 फेब्रुवारी 2025 रोजी कुंभमेळ्याची सांगता होणार आहे. 12 वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यात जगभरातील लाखो भक्त, संत आणि साधू उपस्थित राहणार आहेत. असा अंदाज वर्तवला जात आहे की, सुमारे 40 कोटी भाविक यंदाच्या कुंभमेळ्यात उपस्थित राहणार आहेत. त्याप्रमाणे कुंभमेळ्यात तयारी केली जात आहे, ज्यामुळे भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये.
गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर आयोजित केल्या जाणाऱ्या या कुंभमेळ्याला प्रचंड महत्त्व आहे. जगभरातील विशेष पाहुणे, अतिथी कुंभमेळ्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासोबत यंदा कुंभमेळ्यात स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी, अब्जाधीश लॉरेन पॉवेल जॉब्स देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन पॉवेल जॉब्स 13 जानेवारी रोजी प्रयागराज येथे येणार आहेत. त्यानंतर त्या निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात मुक्काम करणार आहेत. यंदा जगाचं लक्ष महाकुंभमेळ्याकडे लागलं आहे. महाकुंभ मेळ्यात यंदा देश विदेशातील लोकं सहभागी होणार आहेत. महाकुंभमेळ्याने जगभराचे लक्ष वेधले आहे.
या संपूर्ण काळात पॉवेल जॉब्स 29 जानेवारीपर्यंत कल्पवासात राहणार आहेत. जिथे त्या धार्मिक विधींमध्ये सहभागी होणार आहेत, शिवाय संगमात स्नान देखील करतील.
लॉरेन पॉवेल जॉब्स एक अब्जाधीश उद्योजक आणि परोपकारी आहे. अॅपल व्यतिरिक्त पॉवेल जॉब्स त्यांच्या परोपकारी कार्यासाठी ओळखले जातात. त्यांनी इमर्सन कलेक्टिव्ह नावाच्या फर्मची स्थापन केली आहे जी शिक्षण, आर्थिक गतिशीलता, इमिग्रेशन आणि पर्यावरण समस्यांवर काम करते.
दर 13 वर्षांनी महाकुंभाचे आयोजन केले जातं. कल्पवास हा महाकुंभाचा एक महत्त्वाचा भाग आहे. महाकुंभदरम्यान जे लोक कल्पवास करतात, ते संगमाजवळ साध्या तंबूत राहतात. पौष पौर्णिमा ते माघ पौर्णिमा या काळात कल्पवास केला जातो. कल्पवास करणारे लोकं दररोज गंगा नदीत स्नान करतात, भजन गातात आणि संतांचे प्रवचन ऐकतात. ज्यामुळे मन शांत आणि प्रसन्न होते.
उपयुक्त Tech Tips, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ठरतील फायद्याच्या! जाणून घ्या
येत्या काही दिवसांतच कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. प्रयागराजमध्ये अनेक भविकांनी हजेरी लावायला सुरुवात केली आहे. कुंभमेळ्याची तयारी देखील पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहे. या कुंभमेळ्यासाठी 40 कोटी भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व भाविकांसाठी AI च्या मदतीने पार्किंगची सोय केली जाणार आहे. संगम शहर प्रयागराजमध्ये पार्किंगसाठी AI चा वापर करण्यात येणार आहे. पार्क+ या ऑटो टेक सुपर ॲप कंपनीने ही सिस्टम विकसित केली आहे.