Amazon चा Echo Spot स्मार्ट क्लॉक लाँच, कस्टमाइज डिस्प्लेसह वाइब्रेंट साउंडने सुसज्ज! किंमत केवळ इतकी
ई कॉमर्स कंपनी Amazon ने स्मार्ट क्लॉक लाँच केला आहे. Echo Spot या नावाने हे नवीनतम स्मार्ट क्लॉक लाँच करण्यात आलं आहे. अमेझॉनने लाँच केलेल्या या नवीनतम स्मार्ट क्लॉकमध्ये कस्टमाइजेबल डिस्प्ले, वाइब्रेंट साउंड आणि स्मार्ट होम कॅपेबिलिटीजसारखे फिचर्स आहेत. शिवाय या क्लॉकमध्ये इनबिल्ड Alexa देखील आहे. या नवीनतम Echo Spot स्मार्ट क्लॉकमध्ये कलरफुल डिस्प्ले, कस्टमाइजेबल क्लॉक फेसेस आणि नवीन अलार्म साउंड्स सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्याच्या कॉम्पॅक्ट डिस्प्लेमुळे वेळ, हवामान आणि साँग टायटल एका नजरेत पाहणे सोपे होते.
मोबाईल युजर्सना मोठा धक्का! JIO नंतर आता या कंपनीने वाढवली लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची किंमत
Amazon Echo Spot काळा आणि निळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक 6,449 रुपयांच्या इंट्रोडक्टरी किंमतीत Echo Spot क्लॉक खरेदी करू शकतात. ऑफर संपल्यानंतर, डिव्हाइस 8,999 रुपयांना उपलब्ध होईल. हे डिव्हाइस Amazon.in, Blinkit आणि Croma च्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला हे नवीन डिव्हाइस खरेदी करायचे असेल तर तुम्ही ऑफरसह खरेदी करू शकता ज्यामुळे तुमच्या पैशांची बचत होईल. (फोटो सौजन्य – pinterest)
Amazon Echo Spot हे एक आकर्षक नवीन स्मार्ट अलार्म क्लॉक आहे. या डिव्हाइसमध्ये 2.83-इंचाचा टच-स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. ग्राहक सहा वेगवेगळ्या कलर थीममधून डिस्प्ले निवडू शकतात. यामध्ये ऑरेंज, व्हायलेट, मॅजेन्टा, लाइम, टील आणि ब्लू या पर्यायांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, युजर्स विविध क्लॉक फेसेसाह कलर मिक्स अँड मॅच करु शकतात.
ग्राहक कस्टम अलार्म सेट करू शकतात आणि त्यांचे आवडते म्यूजिक किंवा गाणी ऐकू शकतात. उदाहरणार्थ, वापरकर्त्यांना फक्त ‘ॲलेक्सा, भक्तिगीतांसह सकाळी 7 वाजताचा गजर सेट कर’ असे म्हणायचे आहे. याव्यतिरिक्त, चार नवीन अलार्म साऊंड- अरोरा, डेब्रेक, एंडेव्हर आणि फ्लटर देखील या नवीनतम अलार्म क्लॉकमधे समाविष्ट केले आहेत.
स्मार्ट क्लॉक 1.73-इंच फ्रंट-फायरिंग स्पीकरसह येते, जे स्पष्ट आवाज आणि डीप बेस ऑफर करते. ॲमेझॉन म्युझिक, ऍपल म्युझिक, स्पॉटिफाई आणि JioSaavn यांसारख्या प्रोवाइडर्सकडून वापरकर्ते अलेक्साला संगीत, पॉडकास्ट आणि ऑडिओबुक प्ले करण्यास सांगू शकतात. यासाठी या ॲप्सची मेंबरशिप असणे आवश्यक आहे. इको स्पॉट कंपेटिबल स्मार्ट होम प्रोडक्ट्ससोबत देखील कनेक्ट केले जाऊ शकते आणि Alexa व्हॉइस कमांडसह रुटीन सेट करण्यासाठी देखील मदत करू शकते. ज्यामुळे तुमची रोजची कामं अधिक सोपी होऊ शकतील.
Meta च्या कंटेट मॉडरेशन पॉलिसीत मोठा बदल, Facebook आणि Instagram वर मिळणार आता X चं ‘हे’ फीचर
ग्राहक अलेक्साला दुसऱ्या अलेक्सा-इनेबल्ड डिव्हाइसेवर प्रिय व्यक्तींना ऑडिओ कॉल करण्यास, हाउसहोल्ड अनाउंसमेंट करण्यास किंवा घरातील इतर अलेक्सा-इनेबल्ड डिवाइसेवर ऑडिबली ड्रॉप करण्यास सांगू शकतात. डिव्हाइस प्रायव्हसी कंट्रोल्सच्या अनेक लेयर्ससोबत तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये मायक्रोफोन ऑन/ऑफ बटण आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पाहण्याची आणि हटवण्याची क्षमता आहे.