आपल्या रोजच्या जीवनात प्रत्येक कामासाठी शॉर्टकटची गरज असते. अशा अनेक वस्तू आहेत, ज्या रियूजेबल आहेत. एकाच वस्तूंसाठी अनेक कांसाठी वापर केला जाऊ शकतो. आपल्या आजूबाजूला अनेक गॅजेट्स आहेत, जे आपण वापरतो आणि काही काळानंतर फेकून देतो. आपण अनेकवेळा पाहिले असेल की जुने गॅझेट देखील कधीकधी आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. आज आम्ही तुम्हाला अशाच Tech Tips सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरात पडलेल्या जुन्या वस्तूंचा नव्या पद्धतीने वापर करू शकता. या Tech Tips तुम्हाला प्रत्येकवेळी फायद्याच्या ठरणार आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
उपयुक्त Tech Tips, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ठरतील फायद्याच्या! जाणून घ्या
हेडफोन कप - जर तुमचे हेडफोन कानात नीट बसत नसेल तर हेडफोन बदलण्याऐवजी त्यांचे कप बदला. ज्यामुळे तुम्हाला नवीन हेडफोन खरेदी करण्याची गरज भासणार नाही.
चार्जरच्या केबल - चार्जरच्या केबलला वाकण्यापासून आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी, तुम्ही त्यात बॉलपेन स्प्रिंग वापरू शकता. ज्यामुळे चार्जर केबल दिर्घकाळासाठी वापरली जाऊ शकते.
सेल्फी टीप - जर तुम्हाला सेल्फी घ्यायचा असेल, तर फोनचा कॅमेरा चालू केल्यानंतर, तुम्ही हेडफोनच्या व्हॉल्यूम रॉकर बटणाने फोटो क्लिक करू शकता. या पद्धतीमुळे सेल्फी अधिक चांगला येतो.
कॅसेट कव्हर - तुमच्याकडे जुने कॅसेट कव्हर असेल तर तुम्ही ते फोन स्टँडमध्ये बनवू शकता. ज्यामुळे तुमचा फोन कुठे पडण्याची किंवा हरवण्याची चिंता संपेल.
क्रेडिट कार्ड - तुमच्याकडे जुने एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड असेल तर त्याचा तुम्ही फोन स्टँड म्हणून वापर करू शकता.
प्लास्टिक ग्लास - जुने प्लास्टिकचे ग्लासेसचा वापर फोन स्पीकर म्हणून केला जाऊ शकतो.
फोन स्टँड - जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या पर्सला फोन स्टँड देखील बनवू शकता. किंवा तुम्ही हेअर पिन फोनच्या मागच्या बाजूला ठेवून स्टँड म्हणून वापरू शकता.