Year Ender 2024: यावर्षी मोबाईल युजर्ससाठी बदलले अनेक नियम, वाचा संपूर्ण यादी
वर्ष 2024 मध्ये टेलिकॉम क्षेत्रात अनेक मोठे बदल झाले आहेत. टेलिकॉम कंंपन्यांसोबतच मोबाईल युजर्ससाठी देखील अनेक नियम बदलले आहेत. जुलै महिन्यात देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या Airtel-Jio-Vodafone Idea यांनी त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनच्या किमती प्रचंड वाढवल्या होत्या, ज्याचा परिणाम थेट ग्राहकांवर झाला. ज्यामुळे अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले.
UPI फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी BharatPe ने लाँच केले नवीन फीचर, अशा प्रकारे करणार युजर्सची सुरक्षा
याशिवाय स्पॅम कॉल आणि मॅसेज टाळण्यासाठी ट्रायने नवीन मॅसेज ट्रेसिबिलिटी नियम लागू केला आहे. या नियमानुसार, बनावट संदेश वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ते ब्लॉक केले जातील. याशिवाय एअरटेलने स्पॅम सोल्यूशन देखील लाँच केलं आहे. या सर्व नियमांबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
खासगी टेलिकॉम कंपन्यांनी जुलै 2024 मध्ये वापरकर्त्यांना मोठा धक्का दिला होता. जुलै महिन्याच्या सुरूवातीला, Airtel, Vodafone Idea आणि Jio सारख्या दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या. त्यामुळे अनेक युजर्स नाराज झाले होते, त्यामुळे युजर्स बीएसएनएलकडे वळले. खासगी टेलिकॉम कंपन्यांचे प्लॅन महाग झाल्याने बहुतांश युजर्स सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे वळू लागले. पोर्ट टू बीएसएनएल सारखे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले. मात्र यामुळे Airtel, Vodafone Idea आणि Jio चे युजर्स कमी झाले.
एअरटेल कंपनीने स्पॅम कॉलला सामोरे जाण्यासाठी यावर्षी आपल्या वापरकर्त्यांसाठी AI सह सुसज्ज एक नवीन सेवा सुरू केली आहे. या सेवेला Airtel AI Spam Detection Solution असे नाव देण्यात आले आहे. ही सेवा रिअल टाइममध्ये स्पॅम कॉल आणि संदेश शोधून वापरकर्त्यांना बनावट कॉल आणि एसएमएसपासून दूर ठेवेल. ज्यामुळे युजर्सची स्पॅम कॉल्सपासून सुरक्षा होईल.
बीएसएनएलने यावर्षी आपल्या ग्राहकांना अनेक नवीन सेवा भेट दिल्या आहेत, त्यापैकी सर्वात महत्वाची म्हणजे सॅटेलाइट-टू-डिव्हाइस सेवा. नावाप्रमाणेच, या सेवेअंतर्गत, नेटवर्क नसलेल्या भागात वापरकर्त्यांना दूरसंचार फायदे प्रदान केले जातील. या सेवेसाठी बीएसएनएलने कॅलिफोर्नियास्थित वायसॅट कंपनीशी हातमिळवणी केली आहे. ज्यामुळे युजर्सना चांगल्या नेटवर्कची सुविधा मिळणार आहे.
डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. निरपराध लोकांना एसएमएसद्वारे फसवणूक करण्यापासून रोखण्यासाठी ट्रायने यावर्षी मेसेज ट्रेसिबिलिटी नियम आणण्याची शिफारस केली होती, जी 11 डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे. या नियमांतर्गत यूजर्सच्या फोनवर येणारे मेसेज ट्रेस करून ते मेसेज ओरिजनल आहे की फेक याबद्दल टेलिकॉम कंपन्या तपास करणार आहेत. स्कॅमर्सनी पाठवलेले बनावट संदेश वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ब्लॉक केले जातील.