Tech Tips: WhatsApp वर अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल मॅसेजमुळे वैतागलात? आत्ताच करा ही सेटिंग
जगभरातील लाखो लोक व्हॉट्सॲपचा वापर करतात. व्हॉट्सॲपवर आपल्याला कोणतीही व्यक्ति मॅसेज करू शकते. तुम्ही एखाद्या व्यक्तिला ओळखत असाल किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तिला ओळखत नसाल, अगदी कोणीही तुम्हाला व्हॉट्सॲपवर मॅसेज करू शकते. व्हॉट्सॲप केवळ मॅसेजिंगसाठीच नाही तर सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी देखील ओळखले जाते. व्हॉट्सॲपमध्ये अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अशाच एका फीचरबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
UPI युजर्सना टार्गेट करतोय ‘Jumped Deposit Scam’; बॅलन्स चेक करताच रिकामं होईल बँक अकाऊंट
व्हॉट्सॲपवर तुम्हाला देखील अनेक अनोळखी लोकांचे मॅसेज येत असतील, पण आता आम्ही तुम्हाला अशा एका खास फीचरबद्दल सांगणार आहोत, जे अनोळखी नंबरवरून येणारे मॅसेज थांबवू शकतात. व्हॉट्सॲपचे Block Unknown Account Messages हे फीचर खास अशा लोकांसाठी तयार करण्यात आले आहे, ज्यांना सतत अनोळखी लोकांच्या मॅसेजचा सामना करावा लागतो. (फोटो सौजन्य – pinterest)
व्हॉट्सॲपच्या या फीचरचा मुख्य उद्देश युजर्सना अनोळखी नंबरवरून सतत येणाऱ्या मॅसेजपासून वाचवणे हा आहे. पण हे फीचर तुम्हाला सुरु करायचे असेल तर त्यासाठी एक अट आहे. तुम्हाला व्हॉट्सॲपवर एक किंवा दोन मॅसेज आल्यावर हे फिचर ॲक्टिवेट होत नाही. परंतु जेव्हा अनोळखी नंबरवरून वारंवार आणि मोठ्या प्रमाणात मॅसेज येऊ लागतात, तेव्हा हे फीचर ॲक्टिवेट होते आणि कार्य करते.
युजर्सचे व्हॉट्सॲप अकाउंट सुरक्षित राहावे यासाठी हे फिचर रोलआऊट तयार करण्यात आलं आहे. हे फीचर चालू केले म्हणजे अनोळखी नंबरवरून येणारा प्रत्येक मेसेज ब्लॉक केला जाईल असे नाही. हे केवळ तेच मॅसेज ब्लॉक करते जे अज्ञात क्रमांकावरून वारंवार आणि मोठ्या प्रमाणात पाठवले जात आहेत.
अनोळखी मॅसेजपासूनच अनोळखी कॉल्स देखील व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणात येतात. Block Unknown Account Messages या फीचरसोबतच कंपनीने अनोळखी कॉल्ससाठी देखील एक फीचर दिलं आहे. Silence unknown callers असं या फीचरचं नाव आहे. हे फीचर कसं ॲक्टिवेट केलं जाईल, जाणून घेऊया.