स्मार्टफोनचा डेटा प्लॅन संपायला आलाय? आताच या टीप्स फॉलो करा, रिचार्ज करण्याची गरज नाही
आज इंटरनेट म्हणजे आपली गरज बनली आहे. इंटरनेट शिवाय आपली काम पूर्ण होणं कठीण आहे. आपल्याकडे स्मार्टफोन असेल पण इंटरनेट नसेल, तर आपला स्मार्टफोन काहीच कामाचा नाही. इंटरनेट म्हणजे स्मार्टफोनमध्ये एक महत्वाचा भाग आहे. ज्याप्रमाणे आपल्या स्मार्टफोनला चार्जिंगची गरज असते, त्याचप्रमाणे त्याला इंटरनेटची देखील गरज असते.
लवकरच लाँच होणार Nothing Phone 3! मिळणार iPhone चं हे फिचर; किती असेल किंमत?
WhatsApp वर एखाद्याला मेसेज करण्यापासून ते ऑनलाइन शॉपिंग करण्यापर्यंत आपल्याला आपल्या सर्व कामांसाठी इंटरनेटची गरज असते. त्यामुळे आपण आपल्या स्मार्टफोन्ससाठी डेटा पॅक रिचार्ज करतो. अनेक रिचार्ज योजनांमध्ये डेटाची मर्यादा असते. मर्यादा गाठली तर इंटरनेटचा वेग कमी होतो. तर काही प्लॅनमध्ये मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट डेटा बंद होतो. काहीवेळा असे होते की आपल्या फोनचा डेटा संपणार आहे आणि आपल्याला कुठेतरी दूर जायचं आहे किंवा काही महत्त्वाचे काम करायचं आहे. अशा परिस्थितीत डेटा संपल्यास लोकांना पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासते. पण, काही टिप्स वापरून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील इंटरनेट डेटा वाचवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
वाय-फाय वापरा – शक्य असल्यास, सार्वजनिक वाय-फाय वापरा. फोन डेटा सेव्ह करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. कारण वायफायचा वापर करताना आपल्याला स्मार्टफोनमधील इंटरनेटची गरज भासत नाही. ज्यामुळे तुम्ही अगदी सहज तुमच्या स्मार्टफोनचा डेटा सेव्ह करू शकता. पण सार्वजनिक वायफाय वापरताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे, अन्यथा आपण हॅकरच्या जाळ्यात अडकू शकतो.
ऑटो अपडेट्स बंद करा – ॲप्सना आपोआप अपडेट होण्यापासून बंद करा. ॲप्स अपडेट केल्याने भरपूर डेटा खर्च होऊ शकतो. ज्यामुळे तुमचा स्मार्टफोन डेटा लगेच संपेल आणि तुम्हाला पुन्हा रिचार्ज करावा लागेल.
हाय क्वालिटी व्हिडिओ आणि ऑडिओ बंद करा – स्मार्टफोनवर कमी क्वालिटीमध्ये व्हिडिओ स्ट्रीम करा. यामुळे डेटाचा वापर कमी होईल. पण कमी क्वालिटी असलेले व्हिडिओ पाहताना तुम्हाला क्लिॲरिटीची समस्या येऊ शकते.
डेटा सेव्हिंग मोड चालू करा – अनेक स्मार्टफोनमध्ये डेटा सेव्हिंग मोड असतो. ते चालू केल्याने डेटाचा वापर कमी होऊ शकतो.
अनावश्यक ॲप्स डिलीट करा – तुम्ही वापरत नसलेले ॲप्स हटवा. हे ॲप्स बॅकग्राउंडमध्ये डेटा वापरू शकतात. ज्यामुळे तुमच्या स्मार्टफोनचा डेटा खर्च होतो.
ब्राउझिंग सेटिंग्ज बदला – तुमच्या ब्राउझरमध्ये डेटा सेव्हिंग मोड चालू करा आणि ॲड ब्लॉकरचा वापर करा.
सोशल मीडिया कमी वापरा – सोशल मीडिया ॲप्स भरपूर डेटा वापरतात. म्हणून, त्यांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा इंटरनेट डेटा कमी खर्च होईल.
कमी क्लाउड स्टोरेज वापरा – क्लाउड स्टोरेजवर फायली सिंक करणे डेटा वापरते. म्हणून, कमी क्लाउड स्टोरेज वापरा.
लोकेशन सेवा बंद करा – जेव्हा आपल्याला लोकेशन सेवांची आवश्यकता नसते तेव्हा ते बंद करा.