स्मार्टफोनच्या Lock Screen वर अशा पद्धतीने सेव्ह करा 'Emergency Contact', संकटकाळी होईल मदत
आपल्या सर्वांकडे स्मार्टफोन आहे. आपल्या सर्वांच्या स्मार्टफोनमध्ये Emergency Contact किंवा Emergency Information सेट करण्याची सुविधा असते. ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहित असेल पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. हे आपल्या स्मार्टफोनमधील एक असं फीचर आहे जे आपल्याला संकट काळात मदत करू शकते. प्रत्येक फोन किंवा स्मार्टफोनमध्ये लॉक स्क्रीन सेट करण्याचा पर्याय असतो. ज्यामध्ये तुम्ही Emergency Contact किंवा Emergency Information सेव्ह करू शकतात. बहुतेक लोक हा पर्याय वापरत नाहीत, कारण त्यांना हा पर्याय कसा वापरायचा हेच माहित नसतं.
सावधान! हे Gadget तुमच्याकडे असल्यास जावं लागेल तुरुंगात, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या लॉकस्क्रीनवर काही महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह करून ठेऊ शकता, ज्या तुम्हाला कठीण काळात मदत करतील. तुम्ही सेव्ह केलेली ही माहिती फोन लॉक केल्यानंतरही तुमच्या फोनच्या स्क्रीनवर दिसते. लोकांना या लॉक स्क्रीन वैशिष्ट्याबद्दल फारशी माहिती नाही आणि माहिती असूनही ते त्याचा योग्य वापर करत नाहीत. या फीचरचा तुम्ही योग्य प्रकारे कसा वापर करू शकता, याबद्दल आता जाणून घेऊया. तुम्ही तुमच्या लॉक स्क्रीनवर कोणतीही विशिष्ट माहिती सेव्ह करू शकता, जेणेकरून ती तुम्हाला कोणत्याही कठीण परिस्थितीत मदत करू शकेल. (फोटो सौजन्य – pinterest)
तुम्ही तुमचा रक्तगट तुमच्या लॉक स्क्रीनवर लिहू शकता. तुमचा रक्तगट कोणता आहे, तुम्ही ते लॉक स्क्रीनवर लिहू शकता, जेणेकरून ते तुमच्या लॉक स्क्रीनवर नेहमी दिसेल. तुमचा अपघात झाला किंवा कोणतीही अशी परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला रक्ताची गरज असेल, तर अशावेळी लोक तुमचा फोन पाहून तुमचा रक्तगट ओळखतील आणि गरज पडल्यास वेळेत तुमच्यासाठी रक्ताची व्यवस्था केली जाऊ शकते.
तुम्ही तुमच्या कोणत्याही नातेवाईक, मित्र किंवा कोणाचाही नंबर तुमच्या लॉक स्क्रीनवर इमर्जन्सी नंबर म्हणून लिहू शकता. अशा परिस्थितीत, तुमचा इमर्जन्सी नंबर तुमच्या फोनच्या लॉक स्क्रीनवर नेहमी दिसेल, ज्यावर गरज पडल्यास इतर कोणतीही व्यक्ती त्या नंबरवर संपर्क साधू शकेल. इमर्जन्सी नंबर आणि रक्तगटाशिवाय तुम्ही तुमच्या लॉक स्क्रीनवर तुमचा पत्ता देखील सेव्ह करू शकता. जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडल्यास, जे लोक तुम्हाला मदत करत आहेत ते इमर्जन्सी नंबरवर संपर्क साधू शकतील किंवा तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाऊ शकतील.
Meta च्या कंटेट मॉडरेशन पॉलिसीत मोठा बदल, Facebook आणि Instagram वर मिळणार आता X चं ‘हे’ फीचर
तुम्हाला कोणतीही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची वाटली, तर तुम्ही ती तुमच्या फोनच्या लॉक स्क्रीनवर सेट करू शकता. यामुळे लोकांना तुमच्या कठीण परिस्थितीत तुम्हाला मदत करणे सोपे होईल. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.