
WhatsApp चॅट डिलीट झाली तरी टेन्शन घेण्याची गरज नाही, अशा प्रकारे करू शकता रिस्टोअर
व्हॉट्सॲपचे जगभरात लाखो युजर्स आहेत. छोट्या कामांपासून ते एखाद्या महत्त्वाच्या कामापर्यंत मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचा वापर केला जातो. मग ते एखाद्याला फोटो पाठवणे असो किंवा महत्त्वाचे डॉक्युमेंट शेअर करणे असो. इथे प्रत्येक काम सहज होते. बहुतेक गोष्टी व्हॉट्सॲपवर शेअर केल्या जातात, त्यामुळे हा डेटा सुरक्षित ठेवणे खूप आवश्यक असतं. मेटाचे लोकप्रिय चॅटिंग ॲप व्हॉट्सॲप केवळ चॅटिंगपुरते मर्यादित नाही. हा प्लॅटफॉर्म कॉलिंग-फाइल शेअरिंगसाठी देखील वापरला जातो. या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्यांची संख्या करोडोंच्या घरात आहे.
हेदेखील वाचा- WhatsApp च्या अडचणी वाढण्याची शक्यता, भारतात बॅन होणार का? सीसीआयकडून तपास सुरु
त्यामुळेच युजर्सच्या गरजेनुसार प्रत्येक सुविधा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. व्हॉट्सॲप जगभरातील लाखो लोक वापरतात. वापरकर्त्याचा अनुभव मजेदार बनविण्यासाठी, व्हॉट्सॲप अनेक वैशिष्ट्ये ऑफर करते ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. युजर्सचा बहुतांश वेळ फक्त व्हॉट्सॲपवरच जातो. व्हॉट्सॲपवर शेअर केलेलं प्रत्येक डॉक्युमेंट आपल्यासाठी महत्त्वाचं असंत. त्यामुळे ते डॉक्युमेंट किंवा चॅट्स डिलीट होणार नाही, याची आपण पूर्णपणे काळीज घेतो. परंतु काहीवेळा व्हॉट्सॲप चॅट्स चुकून डिलीट होतात आणि अनेकांना ते रिस्टोअर करण्याचा योग्य मार्ग माहित नसतो. त्यानंतर आपल्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. अशावेळी काळजी करण्याऐवजी, आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, ज्यामुळे आपले चॅट्स पुन्हा रिस्टोअर होतील. (फोटो सौजन्य – pinterest)
अँड्रॉईड युजर्सना चॅट्स रिस्टोअर करण्यासाठी काही महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. अँड्रॉईड युजर्ससाठी गुगल ड्राइव्हवर चॅट बॅकअप घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. चॅट बॅकअपसाठी, तुम्हाला त्याच नंबरची आवश्यकता आहे ज्या नंबरवरून तुमचे चॅट्स डिलीट झाले आहेत.
आयफोनमध्ये व्हॉट्सॲप चॅटचा बॅकअप घेण्यासाठी, गुगल ड्राइव्हऐवजी iCloud बॅकअप आवश्यक आहे. काही स्टेप्स फॉलो केल्यानंतर आयफोनमध्ये बॅकअप सहज घेता येतो.