
New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर
Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना… या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी WhatsApp एक नवीन स्टिकर पॅक घेऊन आली आहे. यामध्ये यूजर्स कोणत्याही दिखाव्याशिवाय त्यांच्या मित्रांना आणि ग्रुप्समध्ये नवीन वर्षाचे स्वागत करणारे स्टिकर्स शेअर करू शकणार आहेत. याशिवाय नवीन व्हिडीओ कॉल ईफेक्ट देखील रोल आऊट करण्यात आला आहे. व्हिडीओ कॉलदरम्यान यूजर्स ईफेक्ट ऑप्शनवर टॅप करून नवीन ईफेक्ट अॅक्सेस करू शकणार आहेत. यामध्ये फायरवर्क्स, कन्फेटी आणि स्टार एनिमेशन सारख्या इफेक्ट्सचा समावेश आहे. यासोबतच एनिमेटिड कन्फेटी रिएक्शनचे देखील पुनरागमन झाले आहे. आता यूजर अॅनिमेटेड कॉन्फेटीसह मेसेजवर प्रतिक्रिया देऊ शकतील. (फोटो सौजन्य – Pinterest)
एवढंच नाही तर नवीन वर्षानिमित्त WhatsApp त्यांच्या यूजर्ससाठी आणखी एक खास आणि स्पेशल गिफ्ट घेऊन आली आहे. WhatsApp ने पहिल्यांदाच स्टेटस अपडेटसाठी एनिमेटिड स्टिकर लाँच केले आहेत. यूजर 2026 च्या थीमवाले लेआउट निवडून तिथे त्यांच्या आवडीचे कोणतेही एनिमेटिड स्टिकर लावू शकतात. हे आतापर्यंतच सर्वात मजेदार फीचर असल्याचं सांगितलं जात आहे.
जर तुम्हाला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टी करायची असेल तर तुम्ही ग्रुप चॅटमध्ये याची प्लॅनिंग करू शकणार आहात. कंपनीने सांगितलं आहे की, यूजर्स ग्रुप चॅटमध्ये ईव्हेंट क्रिएट करू शकणार आहेत. या ईव्हेंटबाबत सर्वांना समजावे, यासाठी याला पिन देखील केले जाऊ शकते. ज्यामुळे ग्रुपमधील सर्व मेंबर्सना या ईव्हेंटबद्दल माहिती मिळणार आहे. जर यूजर्सची इच्छा असेल तर ते फूड, ड्रिंक्स आणि अॅक्टिव्हिटीवर निर्णय घेण्यासाठी पोलची मदत घेऊ शकतात. WhatsApp च्या या नवीन फीचर्स आणि ईफेक्टमुळे यूजर्सचे नवीन वर्ष आणखी खास होणार आहे. यूजर्स अगदी दणक्यात नवीन वर्षाचं स्वागत करू शकणार आहेत. याशिवाय यूजर्स अतिशय मजेदार पद्धतीने त्यांच्या मित्र आणि कुटूंबियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकणार आहेत.
Ans: होय. WhatsApp वापरण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. फक्त इंटरनेट (डेटा/Wi-Fi) लागतो.
Ans: होय. WhatsApp मध्ये End-to-End Encryption असल्यामुळे तुमचे चॅट्स आणि कॉल्स सुरक्षित राहतात.
Ans: होय. WhatsApp कॉल्स इंटरनेट डेटा वापरून होतात, मोबाईल नेटवर्कची गरज नाही.