
Tech Tips: तुमच्या WhatsApp चॅट्सवर कोणी नजर ठेवतंय का? आत्ताच ऑन करा या 5 प्रायव्हसी सेटिंग्स, जाणून घ्या
सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp चे जगभरात करोडो युजर्स आहेत. लोकं त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी WhatsApp चा वापर करतात. म्हणजेच अगदी कुटूंबियांना मेसेज करण्यापासून ते ऑफीस ग्रुपवर अपडेट देण्यापर्यंत WhatsApp आपली वेळोवेळी मदत करतो. WhatsApp वर आपण सतत कोणासोबत चॅट्स करत असतो. पण आपल्या मनात नेहमीच एक भिती असते, ती म्हणजेच आपल्या WhatsApp चॅटवर कोणी नजर ठेवत आहे का?
खरं तर, WhatsApp एक सुरक्षित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मानले जाते. WhatsApp द्वारे आपण मित्रांना, कुटूंबियांना, ऑफीस फ्रेंड्सना मेसेज करतो. अनेकांना आपण दिवसभरात आपल्यासोबत काय काय घडलं याचे अपडेट WhatsApp द्वारे देतो. पण तुम्ही शेअर करत असलेली ही सर्व माहिती कोणी वाचत असेल किंवा कोणी त्यावर नजर ठेवत असेल तर? WhatsApp कितीही सुरक्षित मानलं जात असलं तरी देखील यामधील प्रायव्हसी आणि सिक्योरिटी सेटिंगशिवाय याचा वापर करणं धोकादायक असू शकतं. आता आम्ही तुम्हाला 5 अशा सेटिंगबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या WhatsApp चॅट्सची सुरक्षा वाढणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
WhatsApp तुमचे चॅट्स आधीपासूनच एंड-टू-एंड एन्क्रिप्ट करतो. मात्र आता तुम्ही तुमचा बॅकअप देखील सुरक्षित ठेऊ शकता. याचा अर्थ असा की WhatsApp, गुगल किंवा अॅपल देखील तुमचे मेसेज वाचू शकणार नाहीत. यासाठी सेटिंग कशी चालू करायची ते जाणून घेऊया.
चक्क मालकाचाच ChatGPT वर विश्वास नाही? Sam Altman च्या एका वाक्याने उडाली खळबळ; म्हणाला, AI टूलवर…