अखेर प्रतिक्षा संपली! Nothing चा सर्वात महागडा Smartphone भारतात लाँच, नव्या Glyph Matrix ने सुसज्ज! प्रिमियम रेंजमध्ये आहे किंमत
अखेर तो दिवस उजाडलाच! स्मार्टफोन युजर्स ज्याची वाट पाहत होते, तो प्रिमियम Nothing Phone 3 अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे. शिवाय या स्मार्टफोनची डिझाईन कंपनीच्या इतर स्मार्टफोनपेक्षा पुर्णपणे वेगळी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनचे अपडेट शेअर केले जात होते. याशिवाय कंपनी सतत स्मार्टफोनबाबत नवीन पोस्ट्स देखील शेअर करत होती. त्यामुळे स्मार्टफोन युजर्सची उत्सुकता प्रचंड वाढली होती. मात्र आता अखेर हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे.
Samsung ने भारतात लाँच केले 2025 बीस्पोक AI अप्लायन्सेस, वैशिष्ट्ये आणि फीचर्स जाणून घ्या
भारतात Nothing Phone 3 स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 79,999 रुपये आणि टॉप-एंड 16GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 89,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन व्हाइट आणि ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची विक्री 15 जुलैपासून Flipkart, Flipkart Minutes, Vijay Sales, Croma आणि दूसऱ्या मेजर रिटेल स्टोर्सद्वारे सुरु होणार आहे. प्री-बुकिंग्स सुरु झाली आहे. विशेष लाँच ऑफर म्हणून, प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना Nothing इअरबड्स मोफत मिळतील. (फोटो सौजन्य – X)
Phone (3) is here. Come to Play.
Pre-order yours. 4 July. pic.twitter.com/k92AZBO7lf
— Nothing (@nothing) July 1, 2025
डुअल-सिम (नॅनो+eSIM) सपोर्ट असणारा Nothing Phone 3, Android 15 वर बेस्ड Nothing OS 3.5 वर चालतो. या स्मार्टफोनला पाच वर्षांचे Android अपडेट्स मिळणार आहे आणि सात वर्षांसाठी सिक्योरिटी पॅच देखील फोनसाठी जारी केले जाणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच 1.5K (1,260 x 2,800 पिक्सेल्स) AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 92.89 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 460ppi पिक्सेल डेंसिटी, HDR10+ सपोर्ट आणि 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. स्मार्टफोनचा डिस्प्ले 2160Hz PWM फ्रीक्वेंसी आणि 4,500 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करतो. हँडसेटमध्ये पुढे Gorilla Glass 7i आणि मागील बाजूला Gorilla Glass Victus प्रोटेक्शन आहे.
Nothing Phone 3 मध्ये Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर आहे, ज्याला 16GB रॅमसह जोडण्यात आलं आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50-मेगापिक्सेल मेन सेंसरसह ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये OIS सपोर्ट आहे. कॅमेरा सेटअपमध्ये OIS सपोर्ट आणि 3x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि एक 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड शूटर यांचा समावेश आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
Nothing Phone 3 मध्ये 512GB पर्यंत स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, ब्लूटूथ 6, NFC, GPS, A-GPS, GLONASS, GALILEO, QZSS, NavIC, 360-डिग्री एंटीना आणि Wi-Fi 7 यांचा समावेश आहे. ऑनबोर्ड सेंसर्समध्ये एम्बिएंट लाइट सेंसर, एक्सेलेरोमीटर, इलेक्ट्रॉनिक कम्पास, जायरोस्कोप, आणि प्रॉक्सिमिटी सेंसर यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑथेंटिकेशनसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनमध्ये IP68-रेटेड डस्ट आणि वॉटर-रेसिस्टेंट बिल्ड आहे. यामध्ये दोन हाय-डेफिनिशन माइक्रोफोन आणि डुअल स्टीरियो स्पीकर्स आहेत.
Nothing Phone 3 मध्ये 5,500mAh बॅटरी (इंडियन व्हेरिअंट) आहे, जो 65W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आहे. असा दावा केला जात आहे की, फोन 54 मिनिटांत बॅटरी 1 टक्क्यांपासून 100 टक्के चार्ज करते. फोन 15W वायरलेस चार्जिंग, 7.5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग आणि 5W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करते. Nothing Phone 3 सह, कंपनीने Nothing Phone 1 आणि Phone 2 मध्ये असलेला ग्लिफ इंटरफेस काढून टाकला आहे. आता फोनमध्ये ग्लिफ मॅट्रिक्स आहे.