Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षणात एडीट करा PDF फाइल! या वेबसाईट करतील तुम्हाला मदत, फ्रीमध्ये होईल काम

अनेकदा आपल्याला पीडीएफ एडीट करावी लागते. परंतु बहुतांश ठिकाणी पीडीएफ एडीट करण्यासाठी पैसे मागितले जातात. पण आता तुम्ही काही सोप्या पद्धतीने आणि फ्रीमध्ये पीडीएफ एडीट करू शकता. यासाठी अगदी काही क्षणाचा वेळ लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 02, 2024 | 07:45 PM
क्षणात एडीट करा PDF फाइल! या वेबसाईट करतील तुम्हाला मदत, फ्रीमध्ये होईल काम

क्षणात एडीट करा PDF फाइल! या वेबसाईट करतील तुम्हाला मदत, फ्रीमध्ये होईल काम

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली आपली अनेक कामं डिजीटल पद्धतीने अगदी सहज आणि काही क्षणात पूर्ण होतात. आपल्याला कोणते डॉक्युमेंट पाहिजे असेल तर त्यासाठी आपण कागद शोधत नाही तर आपल्या स्मार्टफोनमध्ये पीडीएफ फाईल शोधतो. आपण आपले अनेक डॉक्युमेंट पीडीएफ फाईलमध्ये सेव्ह केलेले असतात. याशिवाय शाळा, कॉलेज किंवा ऑफीसमधून अनेक फॉर्म्स देखील आपल्याला पीडीएफ स्वरूपात पाठवले जातात. शाळेचे अनेक प्रोजेक्ट्स देखील पीडीएफ स्वरुपात केले जातात.

अनेकदा वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी आपण पीडीएफ फाईल तयार करतो तर कधी आपल्याला पीडीएफ फाईल एडीट करायची असते. पीडीएफ फाईल तयार करायची प्रोसेस तर अनेकांना माहीत आहे. पण पीडीएफ फाईल एडीट कशी करायची याबाबत अजूनही काहींना शंका आहे. तर आता तुमची ही शंका दूर होणार आहे. आता आम्ही तुम्हाला काही अशा वेबसाईट्सबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला पीडीएफ एडीट करण्यासाठी मदत करणार आहेत. (फोटो सौजन्य – istockphoto)

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पीडीएफचा फुल फॉर्म ‘पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट’ आहे. पीडीएफ फाइल्स ऑनलाइन शेअर आणि रिसिव्ह केल्या जाऊ शकतात. आपल्याला पीडीएफ कशा तयार करायच्या हे तर माहित आहे. पण त्या एडीट कशा करायच्या याबाबत अनेकांना माहिती नाही. तुम्ही काही सोप्या पद्धतीने पीडीएफ एडीट करू शकता. आणि यासाठी अगदी काही क्षणाचा वेळ लागणार आहे. शिवाय पीडीएफ एडीट करण्यासाठी कोणताही खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही फ्रीमध्ये पीडीएफ एडीट करू शकता. पीडीएफ ऑनलाइन एडीट करण्यासाठी, तुम्हाला काही वेबसाइटची मदत घ्यावी लागेल. जिथे तुमचे काम मोफत केले जाईल.

अशा प्रकारे करा पीडीएफ एडीट

DocFly

डॉकफ्लाय वेबसाईटच्या मदतीने तुम्ही अगदी काही क्षणात पीडीएफ एडीट करू शकता. येथे प्रत्येक महिन्याला वापरकर्त्यांना तीन पीडीएफ फाइल्स फ्रीमध्ये एडीट करण्याची सुविधा मिळते. यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कस्टम टेक्स्ट जोडू शकता. बॅकग्राऊंड बदलू शकता. डॉकफ्लाय वेबसाईटवर पीडीएफ एडीट करण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. तुम्हाला फक्त येथे पीडीएफ अपलोड करावी लागेल. तुमच्या गरजेनुसार तुम्ही पीडीएफ एडीट करू शकता.

Sejda

पीडीएफ एडीट करण्यासाठी सेजदा ही देखील एक वेबसाईट मोफत आहे. येथे पीडीएफचा मजकूर एडिट करता येतो, त्याचप्रमाणे नवीन पीडीएफ फाइलही तयार करता येते. आपण याद्वारे पीडीएफवर स्वाक्षरी देखील करू शकता.

Formswift

Formswift वेबसाईट युजर्सना मोफत पीडीएफ एडीट करण्याची सुविधा देते. येथे पीडीएफ कोणत्याही अडचणीशिवाय एका क्षणात पीडीएफ एडीट केले जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बॅकग्राऊंड आणि मजकूर बदलू शकता.

PDFescape

PDFescape ही एक वेबसाइट आहे जी तुम्हाला विनामूल्य पीडीएफ एडीट करण्याची परवानगी देते. येथे एक नवीन पीडीएफ देखील तयार केला जाऊ शकतो. वापरकर्ते पीडीएफमध्ये दुरुस्त्या देखील करू शकतात. एडीट करण्यासाठी, तुम्हाला डॉक्युमेंट येथे अपलोड करावे लागेल आणि तुमच्यासमोर एडीटींगचा पर्याय ओपन होईल.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पीडीएफ एडीट करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • पीडीएफ एडिट करताना डॉक्युमेंटचा आकार मोठा नसावा हे लक्षात ठेवावे लागेल.
  • तुम्ही येथे 50 MB पेक्षा जास्त मोठे डॉक्युमेंट अपलोड करू शकणार नाही.
  • वापरकर्ते मोबाइलद्वारे देखील पीडीएफ एडीट करू शकतात. यासाठी डेस्कटॉपसाठी जी पद्धत आहे तीच पद्धत अवलंबावी लागेल.

Web Title: Tech tips use this website to edit your pdf file free of cost know the process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2024 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

iPhone 17 Air की iPhone 17 Slim? कोणत्या नावाने लाँच केला जाणार Apple चा सर्वात पातळ iPhone?
1

iPhone 17 Air की iPhone 17 Slim? कोणत्या नावाने लाँच केला जाणार Apple चा सर्वात पातळ iPhone?

Samsung Galaxy Tab S10 Lite: पावरफुल बॅटरी आणि S Pen सपोर्ट… अनोख्या फीचर्ससह लाँच झाला नवीन Samsung टॅबलेट
2

Samsung Galaxy Tab S10 Lite: पावरफुल बॅटरी आणि S Pen सपोर्ट… अनोख्या फीचर्ससह लाँच झाला नवीन Samsung टॅबलेट

Apple Store: iPhone 17 लाँचपूर्वी कंपनीची मोठी घोषणा! भारतातील या शहरात सुरू होणार Apple चे नवं स्टोअर
3

Apple Store: iPhone 17 लाँचपूर्वी कंपनीची मोठी घोषणा! भारतातील या शहरात सुरू होणार Apple चे नवं स्टोअर

Google Pixel 10: iPhone वरून Pixel 10 वर शिफ्ट होणं झालं सोपं, केवळ 30 मिनिटांत ट्रान्सफर होणार डेटा!
4

Google Pixel 10: iPhone वरून Pixel 10 वर शिफ्ट होणं झालं सोपं, केवळ 30 मिनिटांत ट्रान्सफर होणार डेटा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.