Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don’t Worry… अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Wi-Fi Password Tip: वायफायचा वापर करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, पासवर्ड. पासवर्डशिवाय आपण वायफाय आपल्या फोनला किंवा लॅपटॉपला कनेक्ट करू शकत नाही. पण जर तुम्ही वायफायचा पासवर्डच विसरलात तर?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 12, 2025 | 07:45 PM
Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don't Worry... अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Tech Tips: अरेरे! पुन्हा विसरलात Wi-Fi चा पासवर्ड? Don't Worry... अँड्रॉईड असो किंवा आयफोन, फक्त फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Close
Follow Us:
  • वायफायला कनेक्ट करा अनेक डिव्हाईस
  • पासवर्ड शेअर करण्याची ही आहे सोपी प्रोसेस

आजच्या काळात वायफाय ही प्रत्येकाची गरज आहे. स्मार्टफोन, स्मार्ट टिव्ही, लॅपटॉप, कंम्प्युटर आणि इतर अनेक गॅझेट्स चालवण्यासाठी वायफायची गरज असते. वायफायमध्ये तुम्ही अनलिमिटेड इंटरनेटचा वापर करू शकता. त्यामुळे हल्ली तुम्हाला अनेक घरांमध्ये वायफाय लावल्याचे पाहायला मिळते. तुम्ही देखील तुमच्या घरी वायफाय लावला असेल. वायफायच्या मदतीने अनेक गॅझेट्स एकाचवेळी वापरणं अत्यंत सोपं होतं. कधी पाहुणे किंवा मित्र घरी आले तर आपण त्यांच्या फोनला देखील वायफाय कनेक्ट करून देतो. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Apple ने लाँच केलं iPhone Pocket! आता कुठेही घेऊन जा तुमचा महागडा फोन, किंमत आहे केवळ इतकी

असं अनेकदा घडतं की, जेव्हा एखादा मित्र घरी येतो आणि तो वायफायचा अ‍ॅक्सेस मागतो. नेमकं अशावेळी आपल्याला पासवर्ड देखील आठवत नाही. तर काहीवेळा पासवर्ड इतका किचकट असतो की तो टाईप करताना देखील वैताग येतो. अशावेळी जर तुमच्याकडे आयफोन असेल आणि समोर अँड्रॉईड युजर असेल तर ही परिस्थिती आणखी कठीण होते. मात्र आता असं होणार नाही. कारण आता आम्ही तुम्हाला काही अशा सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही आयफोनवरून अँड्रॉईडवर आणि अँड्रॉईडवरून आयफोनवर पासवर्ड शेअर करू शकणार आहेत. याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. याच प्रोसेसबद्दल आता जाणून घेऊया.

आयफोनवरून अँड्रॉईडवर पासवर्ड कसा शेअर करायचा?

  • आयफोनवरून अँड्रॉईड स्मार्टफोनवर पासवर्ड शेअर करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आयफोनवरून अँड्रॉईड स्मार्टफोनवर पासवर्ड शेअर करू शकणार आहात.
  • यासाठी सर्वात आधी आयफोने सेटिंग ओपन करा आणि वायफाय ऑप्शनवर टॅप करा
  • तुम्ही तुमच्या आयफोनमध्ये जे नेवटर्क कनेक्ट केले आहे, त्याच्या बाजूला दिसणाऱ्या i आयकॉनवर टॅप करा. इथे तुम्हाला वायफायचं नाव दिसणार आहे, पासवर्ड नाही.
  • पासवर्ड पाहण्यासाठी Password वर टॅप करा आणि फेस आयडी किंवा टच आयडीने ऑथेंटिकेट करा.
  • आता तुम्हाला स्क्रीनवर पासवर्ड दिसेल. हा पासवर्ड तुम्ही कॉपी करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.
  • यानंतर तुमचे मित्र पासवर्ड पेस्ट करून वायफाय कनेक्ट करू शकता.

याशिवाय दुसरी सोपी पद्धत म्हणजे तुम्ही वायफाय डिटेल्स QR कोडद्वारे देखील शेअर करू शकता. यासाठी Shortcuts अ‍ॅप किंवा एखाद्या फ्री QR जनरेट वेबसाईटवर जा, तुमच्या नेटवर्कची माहिती तिथे पेस्ट करा आणि हा QR कोड तुमच्या मित्रांना स्कॅन करायला सांगा.

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार आज हे स्पेशल रिवॉर्ड्स, लवकरात लवकर क्लेम करा आजचे रिडीम कोड्स

अँड्रॉईडवरून आयफोनवर पासवर्ड कसा शेअर करायचा?

  • अँड्रॉईडमध्ये ही प्रोसेस आणखी सोपी आहे. तुम्हाला केवळ खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत यानंतर तुम्ही अँड्रॉईडवरून आयफोनवर पासवर्ड शेअर करू शकणार आहात.
  • सर्वात आधी सेटिंग ओपन करा आणि नेटवर्क आणि इंटरनेट हा पर्याय निवडा.
  • यानंतर इंटरनेटवर टॅप करा आणि तुम्ही कनेक्ट असलेला वायफाय नेटवर्क ओपन करा.
  • इथे तुम्हाला QR कोडचं ऑप्शन दिसणार आहे, त्यावर टॅप करा.
  • आता तुमच्या आयफोनवाल्या मित्राला कॅमेरा किंवा स्कॅनरने हा QR कोड स्कॅन करायला सांगा.
  • यानंतर काही क्षणातच तुमच्या मित्राला देखील वायफायचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे.
💡

Frequently Asked Questions

  • Que: वाय-फाय म्हणजे काय?

    Ans: वाय-फाय हे वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञान आहे जी इंटरनेट कनेक्शनला केबलशिवाय डिव्हाइसपर्यंत पोहोचवते.

  • Que: वाय-फाय कसे काम करते?

    Ans: वाय-फाय राऊटरच्या मदतीने सिग्नल रेडिओ वेव्हच्या स्वरूपात डिव्हाइसपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे तुम्ही इंटरनेट वापरू शकता.

  • Que: वाय-फाय आणि इंटरनेट यात फरक काय आहे?

    Ans: इंटरनेट म्हणजे जागतिक नेटवर्क आहे, तर वाय-फाय हा त्या इंटरनेटला जोडण्याचा एक वायरलेस मार्ग आहे.

Web Title: Technology news marathi how to share wifi password from android to iphone or from iphone to android know easy tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • internet
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन वर्जन! लवकरच बदलणार डिजिटल क्रिएशनचा खेळ, Google करणार कमाल
1

Gemini AI मध्ये येणार Nano Banana चं नवीन वर्जन! लवकरच बदलणार डिजिटल क्रिएशनचा खेळ, Google करणार कमाल

Today’s Google Doodle: आजचे डूडल बोलतंय गणिताची भाषा, क्रिएटिव्ह पद्धतीने सेलिब्रेट केलं Quadratic Equation
2

Today’s Google Doodle: आजचे डूडल बोलतंय गणिताची भाषा, क्रिएटिव्ह पद्धतीने सेलिब्रेट केलं Quadratic Equation

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार आज हे स्पेशल रिवॉर्ड्स, लवकरात लवकर क्लेम करा आजचे रिडीम कोड्स
3

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार आज हे स्पेशल रिवॉर्ड्स, लवकरात लवकर क्लेम करा आजचे रिडीम कोड्स

Meta चा मोठा निर्णय! आता Facebook वर ‘या’ ठिकाणांहून Like बटन होणार गायब
4

Meta चा मोठा निर्णय! आता Facebook वर ‘या’ ठिकाणांहून Like बटन होणार गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.