Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार आज हे स्पेशल रिवॉर्ड्स, लवकरात लवकर क्लेम करा आजचे रिडीम कोड्स
बॅटल रॉयल गेम फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्स जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. वेगवेगळ्या वेपन्सच्या मदतीने आणि ट्रिक्सच्या मदतीने प्लेअर्स शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. फ्री फायर मॅक्स प्लेअर्सना रँक सिस्टमवर जाणं अत्यंत गरजेचं असतं. यासाठी प्लेअर्स सतत प्रयत्न करतत असतात. फ्री फायर मॅक्समधील टॉप रँक ग्रँडमास्टर आहे. या रँकपर्यंत पोहोचण्यासाठी प्लेअर्स प्रचंड मेहनत करत असतात.
Samsung करतेय मोठी तयारी! iPhone 17 Pro प्रमाणेच भगव्या रंगात लाँच होणार Galaxy S26 सीरीज
टॉप रँक ग्रँडमास्टरपर्यंत पोहोचणं सोपं नाही. या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी प्लेअर्स प्रचंड मेहनत करत असतात. असे अत्यंत कमी प्लेअर्स आहेत, जे या रँकपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतात. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला या टॉप रँक ग्रँडमास्टरपर्यंत पोहोचण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्हाला नक्कीच टॉप रँक ग्रँडमास्टरपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. याशिवाय 12 नोव्हेंबरसाठी गरेनाने रिडीम कोड्स देखील जारी केले आहेत. या रिडीम कोड्सबाबत देखील आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
फ्री फायर मॅक्समध्ये तुम्ही एकट्याने खेळण्यापेक्षा तुमच्या टीमसोबत खेळण्याला अधिक प्राधान्य द्या. तुमची टीम जितकी मजबूत असेल तितकीच तुमची रँक वाढणार आहे आणि तुम्हाला ग्रँडमास्टर रँक गाठण्यासाठी मदत होणार आहे. याच्या मदतीने तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये जास्त पॉईंट मिळवण्याची संधी मिळते. तुमची मजबूत टिम तुम्हाला गेममध्ये जास्त काळ टिकून राहण्यास देखील मदत करते, ज्यामुळे जास्तीत जास्त मॅच जिंकण्याची शक्यता वाढते.
मल्टीप्लेयर गेम फ्री फायर मॅक्समध्ये वेगवेगळ्या प्रकराचे वेपन्स उपलब्ध असतात. यामध्ये असॉल्ट राइफलपासून Sniper पर्यंत सर्व वेपन्स शत्रूंना हरवण्यासाठी आणि त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी मदत करतात. या वेपन्सचा योग्य वापर केला तर तर तुम्हाला मॅच जिंकण्याची संधी मिळते आणि ग्रँडमास्टर रँक गाठण्यासाठी मदत देखील होते. पण यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला गनचा योग्य वापर करता आला पाहिजे. तुम्हाला जर गन चालवता येत नसेल तर तुम्ही ट्रेनिंग मोडमध्ये जाऊन याची प्रॅक्टिस करू शकता.
नेहमी बिगनर्स अशा कॅरेक्टर्सची निवड करतात, ज्यांचा वापर पॉपुलर प्रो प्लेयर्स करतात. मात्र बिगनर्सने पॉपुलर प्रो प्लेयर्सची नक्कल करणं, योग्य नाही. तुमच्या गेमिंग शैली आणि संघातील भूमिकेनुसार पात्र निवडणे खूप फायदेशीर ठरेल. यामुळे तुम्हाला जास्तीचा फायदा होणार आहे.






