अनोखी कॅमेरा डिझाईन आणि यूनिक फीचर्स.... फास्ट चार्जिंग सपोर्टसह हा स्मार्टफोन लाँच, किंमत केवळ 12,999 रुपये
Tecno Pova 7 5G सीरीज भारतात लाँच करण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या या सिरीजअंतर्गत Tecno Pova 7 5G आणि Tecno Pova 7 Pro 5G हे व्हेरिअंट्स लाँच करण्यात आले आहे. हे स्मार्टफोन MediaTek च्या Dimensity 7300 Ultimate चिपसेट्स ने सुसज्ज आहे.
Tecno Pova 7 5G ची किंमत भारतात 8GB + 128GB ऑप्शनसाठी 12,999 रुपये, 8GB + 256GB ऑप्शनसाठी 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने एका प्रेस रिलीजमध्ये सांगितलं आहे की, या मर्यादित कालावधीच्या किमती आहेत आणि त्यात बँक ऑफर्सचा समावेश आहे. हा हँडसेट गीक ब्लॅक, मॅजिक सिल्व्हर आणि ओएसिस ग्रीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Tecno Pova 7 Pro 5G ची किंमत भारतात 8GB + 128GB ऑप्शनसाठी 16,999 रुपये आणि 8GB + 256GB ऑप्शनसाठी 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन डायनॅमिक ग्रे, गीक ब्लॅक आणि निऑन सायन शेड्समध्ये उपलब्ध आहे. कंपनीने माहिती दिली आहे की Tecno Pova 7 5G आणि Pova 7 Pro 5G स्मार्टफोन भारतात फ्लिपकार्टद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. ही विक्री 10 जुलैपासून सुरू होईल. (फोटो सौजन्य – X)
🚨 TECNO POVA 7 Series Resmi Hadir!
Saatnya tampil Next Level Stylish dengan performa brutal dan fitur-fitur gahar dari lini terbaru TECNO! 💥🔥 Varian yang bisa kalian pilih:
1️⃣ POVA 7 Ultra 5G – 12GB+256GB
2️⃣ POVA Curve 5G – 8GB+256GB (Eksklusif di Shopee hingga 13 Juli 2025) pic.twitter.com/J0eQwBy7AJ— TECNO Indonesia (@tecnoindonesia) July 4, 2025
Tecno Pova 7 Pro 5G हँडसेटमध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट आणि 4,500 निट्स पीक ब्राइटनेस लेवलसह एक 6.78-इंच 1.5K (1,224×2,720) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर बेस Tecno Pova 7 5G मध्ये हाय ब्राइटनेस मोडमध्ये 900 निट्सपर्यंत ब्राइटनेस लेवलसह 6.78-इंच फुल-HD+ (1,080×2,460 पिक्सेल्स) LTPS IPS पॅनल देण्यात आला आहे.
Tecno Pova 7 5G आणि Pova 7 Pro 5G दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4nm MediaTek Dimensity 7300 Ultimate प्रोसेसर देण्यात आला आहे आणि 256GB पर्यंत UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज ऑफर करते. तर प्रो व्हेरिअंट 8GB LPDDR5 रॅमला सपोर्ट करते, वनिला मॉडेल 8GB LPDDR4 रॅमसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोन्स Android 15-बेस्ड HiOS 15 वर चालतो आणि Ella AI चॅटबॉट ऑफर करतो. जो हिंदी, मराठी आणि तमिळ अशा अनेक भारतीय भाषांना सपोर्ट करतो.
Tecno चा दावा आहे की, Pova 7 5G सीरीज हँडसेट्स एक इंटेलिजेंट सिग्नल ऑप्टिमाइजेशन सिस्टमने सुसज्ज आहे. याच्या मदतीने भारतातील कमी नेटवर्क असलेल्या आणि दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी सुधारते. यात 86.5 टक्के अँटेना एन्क्लोजर डिझाइन आणि 4×4 एमआयएमओ सपोर्ट देण्यात आला आहे आहे, ज्यामुळे मजबूत सिग्नल रिसेप्शन, जलद डेटा स्पीड आणि कमी ब्लाइंड स्पॉट्स शक्य होतात. सीरीजमध्ये VOWiFi Dual Pass देखील आहे, जो यूजर्सला SIM 1 अॅक्टिव झाल्यावर SIM 2 वर कॉल वेटिंग अलर्ट्स रिसीव करण्याची परवानगी देतो.
फोटोग्राफीसाठी, Tecno Pova 7 5G एक 50-मेगापिक्सेल प्राइमरी रियर सेंसर आणि एक लाइट सेंसरसह येतो. Pro मॉडलमध्ये 64-मेगापिक्सेल Sony IMX682 मेन सेंसरसह एक 8-मेगापिक्सेल सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये फ्रंटला 13-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Tecno Pova 7 5G सीरीज फोन्समध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Pro मॉडेल 30W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. हँडसेटच्या मागील बाजूस असलेल्या मागील कॅमेरा मॉड्यूल्सभोवती असलेल्या नवीन डेल्टा लाईट इंटरफेसमध्ये 104 मिनी एलईडी लाईट्स आहेत जे संगीत, नोटिफिकेशन्स, वॉल्यूम आणि चार्जिंगला प्रतिसाद देतात.