Microsoft ने पाकिस्तानला केलं बाय-बाय! 25 वर्षांचं नात अखेर संपल, कंपनीने सांगितलं हे कारण; वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Microsoft Shuts Down In Pakistan: टेक्नोलॉजीच्या जगातील सर्वात मोठं नाव असलेली मायक्रोसॉफ्ट कंपनी पाकिस्तानमधून बाहेर आली आहे. म्हणजेच कंपनीने पाकिस्तानमधील कामकाज बंद केलं आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनीने याबाबत आधीच संकेत दिले आहेत. याशिवाय कंपनीतील कर्मचाऱ्यांना देखील याबाबत माहिती देण्यात आली होती. सुमारे 25 वर्षांपासून सुरु असलेले आपलं कामकाज कंपनीने आता थांबवलं आहे. टेक रडारच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानमध्ये माइक्रोसॉफ्टचे ऑपरेशन बंद करण्यात आले आहे. आता इथे केवळ एक ऑफीस आहे. या ऑफीसमध्ये केवळ 5 कर्मचारी आहेत. मायक्रोसॉफ्टने घेतलेला हा निर्णय पाकिस्तानातील टेक इंडस्ट्रीला लागलेला सर्वात मोठा धक्का आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 25 वर्षांपूर्वी माइक्रोसॉफ्टने पाकिस्तानात कामकाज सुरु केले होते. त्यावेळी जावेद रहमान नावाच्या व्यक्तीने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांची गणना मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानच्या संस्थापकांमध्ये केली जाते. रहमानच्या लिंक्डइन पोस्टमधून काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्या अनेक प्रश्न उपस्थित करतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
जव्वाद रहमान यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे की, एक काळ आता संपला आहे. 25 वर्षांपूर्वी जून महिन्यात मला पाकिस्तानमध्ये मायक्रोसॉफ्ट लाँच करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता हे कामकाज थांबवण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे की, मायक्रोसॉफ्टचे पाकिस्तानातील कामकाज थांबवले जाणार आहे याबाबत कंपनीतील उर्वरित कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. त्यांनी लिहिले की कंपनीचा हा निर्णय विचार करण्यास भाग पाडतो.
Microsoft आणि Apple ला टाकलं मागे! Nvidia ने बनवला नवा रेकॉर्ड, इतिहास बदलणार का?
रहमानने दिलेल्या माहितीनुसार, हे आपल्या देशाने निर्माण केलेल्या वातावरणाचे प्रतिबिंब आहे. असे वातावरण ज्यामध्ये मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीलाही अस्थिरता दिसते. ते म्हणाले की, आता पाकिस्तानबाबत काय बदल होत आहेत हा प्रश्न विचारला पाहिजे, असे काय आहे ज्यामुळे या महाकाय कंपनीला देश सोडावा लागला. तथापि, मायक्रोसॉफ्टकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र असं सांगितलं जात आहे की, कंपनी लवकरच याबाबत अधिकृतपणे माहिती देऊ शकते.
जगातील आघाडीच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने 7 मार्च 2000 रोजी पाकिस्तानमध्ये आपले कामकाज सुरू केले, परंतु 3 जुलै 2025 रोजी, कोणतीही औपचारिक घोषणा न करता, कंपनीने पाकिस्तानमधून आपले कामकाज पूर्णपणे बंद केले आहे. राजकीय आणि आर्थिक अस्थिरता हे कंपनीच्या निर्णयामागील मुख्य कारणं मानलं जात आहे. मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे कोणतेही कारण सांगितले नाही, परंतु उद्योग तज्ञांचा असा विश्वास आहे की पाकिस्तानची अस्थिर अर्थव्यवस्था, राजकीय अस्थिरता आणि कमकुवत व्यावसायिक वातावरण ही यामागील प्रमुख कारणे आहेत.