Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पासवर्ड लीक होण्यामागे ही आहेत महत्त्वाची कारणं! स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

Password Leak: बँकींगपासून सोशल मीडिया अकाऊंटपर्यंत आपण वेगवेगळे पासवर्ड सेट करतो. मात्र अनेकदा हे पासवर्ड लीक होतात. आपल्या अकाऊंटचे पासवर्ड लीक झाले तर आपल्यासाठी मोठं संकट निर्माण होऊ शकतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 23, 2025 | 09:53 AM
पासवर्ड लीक होण्यामागे ही आहेत महत्त्वाची कारणं! स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

पासवर्ड लीक होण्यामागे ही आहेत महत्त्वाची कारणं! स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

Follow Us
Follow Us:

अलीकडेच जगभरातील सर्वात मोठ्या हॅकर अटॅकबाबत माहिती समोर आली होती. या घटनेत गुगल आणि फेसबूक युजर्सचे 16 अब्जांहून अधिक पासवर्ड लीक झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात भिती निर्माण झाली होती. याशिवाय युजर्सचा डेटा आणि ऑनलाईन सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. कारण बँकिंग, सोशल मीडिया, ईमेल यासह इतर अकाऊंटचे पासवर्ड लीक झाल्याने युजर्स अडचणीत सापडले होते. हॅकर्स वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून युजर्सचे पासवर्ड आणि डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. आता आम्ही तुम्हाला अशा काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून हॅकर्स युजर्सचे पासवर्ड आणि डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात.  (फोटो सौजन्य – Pinterest)

तुमच्या अकाऊंटचा Password तर लिक झाला नाही ना? कसं कराल चेक? या 4 स्टेप्स करणार तुमची मदत

Phishing

युजर्सचा डेटा चोरण्याची फिशिंग ही सर्वात सामान्य पद्धत आहे. यामध्ये हॅकर्स नकली ईमेल, वेबसाइट किंवा मेसेज करून युजर्सना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात आणि युजर्सची माहिती चोरतात. उदाहरणार्थ, तुम्हाला एक असा ईमेल येऊ शकतो जो तुमच्या बँक किंवा सोशल मीडिया साइटसारखा दिसतो आणि पासवर्ड रीसेट किंवा पडताळणीसाठी विनंती करतो. जेव्हा तुम्ही या लिंकवर क्लिक करता आणि पासवर्ड एंटर करता तुमची सर्व माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते.

Data Breach

अनेकदा हॅकर्स मोठ्या कंपन्यांच्या सर्वरवर हल्ला करतात आणि लाखो युजर्सची माहिती चोरतात. यामध्ये ईमेल, यूजरनेम आणि पासवर्ड अशा महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश असतो. जर तुम्ही अशा वेबसाइटवर खाते तयार केले असेल ज्याचे उल्लंघन झाले असेल, तर तुमचा पासवर्ड देखील लीक होऊ शकतो.

Keylogger

हा एक प्रकारचा मालवेअर असतो. हे तुम्ही कीबोर्डवर टाईप करत असलेली सर्व माहिती रेकॉर्ड करते. जेव्हा तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड एंटर करतात, तेव्हा कीलॉगर ही माहिती चोरतो आणि हॅकरपर्यंत पोहोचवतो. अशा घटना सहसा स्पॅम लिंक, संक्रमित वेबसाइट किंवा थर्ड-पार्टी सॉफ्टवेयरद्वारे घडतात. हा मालवेअर थर्ड पार्टी सॉफ्टवेअरद्वारे तुमच्या फोनमध्ये प्रवेश करतो.

Brute Force Attack

या पद्धतीमध्ये हॅकर्स युजर्सच्या पासवर्डचा अंदाज लावतात आणि कॉम्बिनेशनचा विचार करतात. सोपे आणि सामान्य पासवर्ड (जसे की 123456 किंवा password123) ब्रूट फोर्स हल्ल्यात सहजपणे तुटतात. म्हणूनच मजबूत पासवर्ड असणे खूप महत्वाचे आहे.

सर्वात मोठा Hackers Attack! सोशल मीडिया युजर्सचा डेटा धोक्यात; Facebook, Google चे 16 अब्ज पासवर्ड लीक

पब्लिक वाय-फाय

जेव्हा तुम्ही पब्लिक वाय – फायचा वापर करता, तेव्हा तुमच्या डिव्हाइसवरून ट्रान्सफर केलेला डेटा हॅकर्सपर्यंत अगदी सहजपणे पोहोचतो.

अशा पद्धतीने राहा सुरक्षित

  • मजबूत आणि यूनिक पासवर्डचा वापर करा.
  • टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) ऑन ठेवा.
  • कोणत्याही संशयास्पद मेल किंवा लिंकवर क्लिक करू नका.
  • सार्वजनिक वाय-फायमध्ये लॉग इन करू नका.
  • तुमच्या डिव्हाइसवर अँटीव्हायरस आणि सुरक्षा सॉफ्टवेअर असल्याची खात्री करा.

Web Title: The reasons why password leaked how to stay safe from hackers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.