
BSNL Recharge Plan: हे आहेत सरकारी टेलिकॉम कंपनीचे 3 ढासू प्लॅन्स! दिर्घकाळ व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे... वाचा किंमत
कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 439 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. हा एक व्हॉईस-ओन्ली प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना होम एलएसए आणि नॅशनल रोमिंगसह (ज्यामध्ये मुंबई आणि दिल्लीच्या एमटीएनएल नेटवर्कचाही समावेश आहे.) कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स (लोकल/STD) ची सुविधा मिळते. यासोबतच या प्लॅनमध्ये यूजर्सना 300 एसएमएस ऑफर केले जातात. या प्लॅनची व्हॅलिडीटी 80 दिवसांची आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ज्या यूजर्सना जास्त डेटाची आवश्यकता असते अशा यूजर्ससाठी कंपनी 485 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. हा एक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. ज्यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह रोज 2 GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. डेली डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 40 kbps होते. याशिवाय कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळते. या प्लॅनची व्हॅलिडीटी 72 दिवसांची आहे.
कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये उपलब्ध असलेल्या 599 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये देखील यूजर्सना अनेक दमदार फायदे ऑफर केले जातात. यामध्ये यूजर्सना होम एलएसए आणि दिल्ली-मुंबई सह नॅशनल रोमिंगमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग (लोकल/STD) ची सुविधा मिळते. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 3 GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. डेटा संपल्यानंतर स्पीड 40 kbps होते. या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस देखील मिळतात. प्लॅनची व्हॅलिजिटी 70 दिवसांची आहे. हा प्लॅन नॉन-स्टॉप डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिर्घकाळ व्हॅलिडीटी यांचे बेस्ट कॉम्बिनेशन आहे.
तुम्ही बीएसएनएल यूजर नसाल तर चिंता करण्याची गरज नाही. कारण बीएसएनएलने त्यांच्या नवीन यूजर्ससाठी एक खास ऑफर सुरु केली आहे. कंपनी त्यांच्या नवीन यूजर्सना 1 रुपयांत नवीन सिम कार्ड खरेदी करण्याची संधी देत आहे. मात्र कंपनीची ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला नवीन बीएसएनएल सिमकार्ड खरेदी करायचे असेल तर ही ऑफर तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. केवळ 1 रुपयांत यूजर्सना रोज 2GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, रोज 100 एसएमएस आणि 30 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते.