ChatGPT वर आलं नवं पर्सनल फाइनेंस फीचर! आता चॅटबोट ठेवणार तुमच्या पैशांचा हिशोब, थेट बँक अकाऊंट्सला होणार कनेक्ट
जेव्हा तुम्ही या नवीन फीचरच्या मदतीने चॅटजीपीटीसोबत तुमचे अकाऊंट्स कनेक्ट करता, त्यानंतर चॅटजीपीटी तुम्हाला एक डॅशबोर्ड दाखवते. यामध्ये तुमचे पैसे कुठे खर्च होत आहेत, जसे खर्च, इन्वेस्टमेंट्स, एक्टिव सब्सक्रिप्शन्स आणि अपकमिंग पेमेंट्स, हा सर्व हिशोब तुम्हाला एकाच ठिकाण सविस्तरपणे समजवला जातो. हे Plaid द्वारे 12,000 हून अधिक संस्थांशी जोडले जाते, ज्यामध्ये चेस, श्वाब, फिडेलिटी, रॉबिनहूड, अॅमेक्स आणि कॅपिटल वन यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या फीचरअंतर्गत तुम्ही चॅटजीपीटीला काही प्रश्न देखील विचारू शकता, ज्यामुळे तुम्हाला खर्चाचे नियोजन करणं आणि बचत करण्यासाठी मदत होणार आहे. तुम्ही चॅटजीपीटीला विचारू शकता की, मी जास्त खर्च करत आहे का, मी 5 वर्षांत एक घर खरेदी करू शकतो का, मी अजून कोणते सब्सक्रिप्शन्स देत आहे, इत्यादी प्रश्न तुम्ही चॅटजीपीटीला विचारू शकता. हे चॅट्स डिफॉल्ट रूपात GPT-5.5 Thinking वर चालतात, जे OpenAI चे नवीन रीजनिंग मॉडेल आहे. प्रो यूजर्सना GPT-5.5 Pro देखील मिळणार आहे. ज्याबाबत ओपनएआयचं असं म्हणणं आहे की, हे पैशांसंबंधित जास्त कठीण प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकते. हे फीचर सुरु करण्यासाठी साईडबारमधून Finances ओपन करा किंवा कोणत्याही चॅटमध्ये केवळल “@Finances, connect my accounts” टाईप करा.
Google ने यूजर्सना दिला मोठा धक्का! नव्या Gmail अकाऊंटमध्ये 15GB नाही तर मिळणार केवळ इतकंच स्टोरेज
ChatGPT तुमचा बॅलेंस, ट्रांजेक्शन्स, इन्वेस्टमेंट्स आणि लायबिलिटी वाचू शकते. हे फीचर पैसे ट्रांसफरस करू शकत नाही आणि तुमचा पूर्ण अकाऊंट नंबर देखील पाहू शकत नाही. जर तुमचा विचार बदलला तर तुम्ही कोणतेही अकाऊंट या फीचरमधून डिस्कनेक्ट करू शकता. सिंक झालेला डेटा 30 दिवसांत पूर्णपणे हटवला जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तुम्ही ‘आर्थिक आठवणी’ देखील डिलीट करू शकता. हे फीचर OpenAI द्वारे पर्सनल फाइनेंस स्टार्टअप ‘Hiro’ चे अधिग्रहण केल्यानंतर एका महिन्याने रोल आऊट करण्यात आले आहे.






