Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
6000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा… Samsung चे दोन नवीन परवडणारे फोन भारतात लाँच, वाचा सविस्तर
सहसा लोकं पैसे वाचवण्यासाठी लोकल आण स्वस्त पावर बँक खरेदी करतात. या गॅझेट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरीची क्वालिटी अत्यंत खराब असते. तसेच यामध्ये कोणतेही प्रॉपर सर्किट प्रोटेक्शन देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत पावर बँकमध्ये ओव्हरलोड होण्याची, तापमान वाढण्याची आणि शॉर्ट सर्किट होण्याची भिती असते. अनेकदा याच कारणांमुळे स्मार्टफोनचा ब्लास्ट देखील होऊ शकतो. यामुळे नेहमी विश्वसनीय आणि चांगल्या कंपनीच्या पावर बँकची खरेदी करा. यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागत असले तरी याचा वापर करताना तुम्ही सुरक्षित राहू शकता. (फोटो सौजन्य: Pinterest)
अनेक लोकं नकळतपणे चुकीच्या ठिकाणी पावर बँक ठेवतात. जसे की, गाडीचे डॅशबोर्ड. अनेकदा आपण घाईत असताना किंवा नकळतपणे पावर बँक कारच्या डॅशबोर्डवर किंवा अशा ठिकाणी ठेवतो जिथे थेट ऊन्हाचा संपर्क येतो. ऊन्हाळ्यात गाडीचे तापमान वाढते, यामुळे ऊन्हात ठेवलेला पावर बँक आणखी गरम होतो आणि लिथियम-आयन बॅटरीची तापमान सहन करण्याची क्षमता संपल्यास त्याचा ब्लास्ट होऊ शकतो.
अनेक लोकं पावर बँक चार्जिंगला लावून त्याचवेळी त्याच पावर बँकला आपला फोन देखील चार्ज करण्यासाठी लावतात आणि यानंतर फोनवर हेवी गेमिंग किंवा व्हिडीओ स्ट्रिमिंग करतात. यामुळे गॅझेट्सवर दबाव पडतो आणि त्यामध्ये उष्णता वाढू शकते. यामुळे गॅझेट्सचा ब्लास्ट होण्याचा धोका असतो.
पावर बँक चार्ज करण्यासाठी लोकल एडाप्टरचा वापर करणं धोकादायक असू शकतं. तसेच पावर बँक चार्ज झाल्यानंतर देखील बराच वेळ त्याला प्लग इन ठेवणं असुरक्षित आहे. प्रत्येक पॉवर बँक विशिष्ट ॲम्पिरेज आणि व्होल्टेज रेटिंगसह येते. तरीही, लोक अनेकदा हे गॅझेट रात्रभर चार्जिंगला लावून ठेवताना फोनसाठी असलेल्या कोणत्याही ‘फास्ट चार्जर’चा वापर करतात. जेव्हा पावर बँक पूर्णपणे चार्ज होते त्यानंतर यामध्ये करंट बसू शकतो. ओवरचार्जिंगमुळे पावर बँकमधील बॅटरी फुगू शकते आणि ब्लास्ट होऊ शकतो. याव्यतिरिक्त, चुकीच्या किंवा डॅमेज केबलचा वापर करून पावर बँक चार्ज केल्यास ब्लास्ट होऊ शकतो.






