डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
हुवावे मेट 90 प्रो मॅक्स CNY 9,499 म्हणजेच सुमारे 1.42 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 9,999 म्हणजेच सुमारे 1.43 लाख रुपये आहे. कलेक्टर्स एडीशनच्या 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 10,999 म्हणजेच सुमारे 1.58 रुपये आणि 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 12,999 म्हणजेच सुमारे 1.86 रुपये आहे. डिव्हाईस रोज गोल्ड, जेड ग्रीन, क्रिस्टल व्हाइट आणि ऑब्सीडियन ब्लॅक या चार रंगांच्या पर्यायांत लाँच करण्यात आला आहे. Ruiying Z10 मॉड्यूल कॅमेराची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 86,000 आहे, तर संपूर्ण प्रो मॅक्स कॅमेरा किटची किंमत CNY 19,499 म्हणजेच सुमारे 2.80 लाख रुपये आहे. (फोटो सौजन्य: X)
नव्या डिव्हाईसमध्ये 6.9 इंच 2848×1320 पिक्सेल डुअल-लेयर ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये 1 ते 120Hz एलटीपीओ रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 1440Hz चे हाय-फ्रीक्वेंसी पीडब्ल्यूएम डिमिंग आणि 12,000 निट्सपर्यंत लोकल पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. BT.2020 कलर गॅमट सपोर्टसह येतो आणि याच्या सुरक्षेसाठी फोनमध्ये कुनलुन ग्लास मिळणार आहे.
फोनमध्ये 100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 6,800mAh बॅटरी मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत रॅमसह किरीन 9050 प्रो चिपसेट मिळणार आहे. यासोबतच, स्मार्टफोनमध्ये हार्मनीओएस 7 मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये वायफाय 7, ब्लूटूथ 6.0, एनएफसी, ई-सिम, स्टारलाईट E2.0 आणि IP68/IP69 रेटिंग सारखे फीचर्स मिळणार आहेत.
स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील मिळणार आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. ज्यामध्ये 1/1.28-इंच सेंसर, RYYB टेक्नोलॉजी, ओआयएस आणि f/1.4 ते f/4.0 पर्यंत सतत बदलणारा अपर्चर देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 40MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील मिळणार आहे. या फोनच्या टेलिफोटो कॅमेऱ्यामध्ये देखील 1/1.28-इंच सेंसर, RYYB टेक्नोलॉजी आणि ओआयएस मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 4x ऑप्टिकल झूम, 8x ऑप्टिकल-क्वालिटी झूम आणि 100x डिजिटल झूम सपोर्ट देखील मिळणार आहे. अधिक चांगल्या कलर रिप्रोडक्शनसाठी यामध्ये 3rd जेनचे रेड मॅपल प्रायमरी-कलर कॅमेरा देखील मिळणार आहे.
स्मार्टफोनच्या कलेक्टर्स एडीशनसह Huawei Ruiying Z10 मॉड्यूल कमेरा देखील फिट केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 1-इंच RYYB सेंसर, 10x अखंड ऑप्टिकल झूम, 24-240mm फोकल रेंज आणि f/2.0-f/4.5 अपर्चर मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 4K व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि 13MP ऑटोफोकस अल्ट्रावाइड सेल्फी कॅमेरा देखील मिळणार आहे.






