एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज
गुगलने नवीन वर्षानिमित्त सादर केलेल्या या डूडलमध्ये रंग-बिरंगे फुगे, सजावट आणि कंफेटी सारख्या उत्सवाचे एलिमेंट्स देखील जोडले आहेत. डूडलमध्ये एक अनोखे एनिमेशन देखील पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये 2025 चे वर्ष बदलून 2026 होत आहे. घड्याळात जेव्हा मध्यरात्री 12 वाजतील आणि नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात केली जाईल, तोच क्षण इथे पाहायला मिळत आहे. हे नवीन डूडल पाहून यूजर्स प्रचंड आनंदी झाले आहेत. यूजर्सना गुगल डूडलच्या मदतीने नवीन वर्षाचे स्वागत करताना आनंद होत आहे. एवढेच नाही तर, या गुगल डूडलवर क्लिक करताच, तुम्ही New Year’s Eve च्या एका पेजवर पोहोचता जिथे तळाशी एक पार्टी पॉपर दिसतो, त्यावर क्लिक केल्यावर त्यातून कोणता कॉन्फेटी बाहेर येतो, ज्यामुळे एक उत्सवाचे वातावरण निर्माण होते. (फोटो सौजन्य – Google)
डूडलच्या डिस्क्रिप्शन पेजवर कंपनीने सांगितलं आहे की, हे एनुअल डूडल जगभरात साजरा केल्या जाणाऱ्या न्यू ईयर ईवचे स्वागत करण्यासाठी तयार करण्यात आाल आहे. जेव्हा अब्जावधी लोकं मित्र आणि त्यांच्या कुटूंबियांसोबत वर्षभरातील खास क्षण आठवतात आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात, त्या खास क्षणासाठी आजचा डूडल तयार करण्यात आला आहे. जगभरात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोकं अतिशय उत्साहात आहेत. सर्वत्र सजावट आणि पार्टीचे वातावरण आहे. प्रत्येकजण आज रात्रीचे प्लॅनिंग करत आहे. हेच सर्व क्षण गुगल डूडलमुळे आणखी खास होणार आहे.
गूगल डूडल्स प्रत्येक खास क्षणी एक विशेष गूगल डूडल जारी करत असते. जसे क्रिएट, आयपीएल, दिवाळी, ख्रिसमस अशा खास सणांनिमित्त गुगल नेहमीच एक नवीन डूडल सादर करत असते. ज्यामुळे यूजर्सचा आनंद आणखी वाढतो. त्याचप्रमाणे आज देखील न्यू ईयर ईव आणखी खास करण्यासाठी गुगलने नवीन डूडल सादर केले आहे. ज्यामुळे जगभरातील लोकांचा उत्साह आणखी वाढला आहे.
Ans: Google Doodle म्हणजे खास दिवस, सण किंवा ऐतिहासिक घटनांनिमित्त Google च्या होमपेजवर दिसणारे क्रिएटिव्ह लोगो.
Ans: न्यू ईयर डूडलमध्ये एनिमेशन, इंटरअॅक्टिव्ह एलिमेंट्स आणि सरप्राईज फीचर्स असतात, जे क्लिक केल्यावर अॅक्टिव्ह होतात.
Ans: क्लिक करताच एनिमेशन सुरू होते, कधी कधी गेम, फटाके किंवा मजेदार व्हिज्युअल्स दिसतात.






