
Christmas 2025: यंदा चॉकलेट्स नाही तर प्रियजनांना गिफ्ट करा हे गॅझेट्स, किंमत तुमच्या बजेटमध्ये
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये एक प्रिमियम दिसणारा स्मार्टफोन पाहिजे असेल तर तुम्ही itel A90 Limited Edition ची निवड करू शकता. हा स्मार्टफोन गिफ्ट करण्यासाठी एक बेस्ट पर्याय आहे. याची डिझाईन आयफोनसारखी आहे आणि हा सेगमेंटमधील पहिला असा स्मार्टफोन आहे, जो मिलिट्री-ग्रेड मजबूती आणि IP54 सेफ्टीसह उपलब्ध आहे, याची किंमत 7,299 रुपये आहे. यामध्ये 5000mAh बॅटरी, AI वॉयस असिस्टेंट आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फिटनेस लवर्ससाठी itel Alpha Edge एक बेस्ट पर्याय आहे. हा इंडस्ट्रीमधील पहिला असा स्मार्टवॉच आहे, जो ट्रेंडी प्रोटेक्टिव केससह लाँच करण्यात आले आहे. या बजेट स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ कॉलिंग, 100+ स्पोर्ट्स मोड्स आणि 7 दिवस टिकणारी बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. या डिव्हाईसची किंमत 1499 रुपये आहे, जो याला एक वॅल्यू-फॉर-मनी गिफ्ट बनवतो.
म्युझिक लवर्ससाठी itel Rhythm Echo इयरबड्स सर्वात चांगले गिफ्ट ठरू शकते. याची किंमत 1,199 रुपये आहे. या बड्समध्ये 50 तासांचा प्लेटाइम आणि क्लियर कॉलिंगसाठी क्वाड माइक ENC देण्यात आला आहे. याचे स्टाइलिश आणि हलके डिझाईन या डिव्हाईसला रोजच्या वापरासाठी एक परफेक्ट गिफ्ट बनवते.
जर तुम्ही बजेटची चिंता करत नसाल आणि तुम्हाला प्रीमियम होम सिनेमाचा अनुभव देणारं गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही ViewSonic X2-4K Pro प्रोजेक्टर निवडू शकता. हे डिव्हाईस 4K गेमिंग आणि मूवीजसाठी डिझाईन करण्यात आले आहे. हे डिव्हाईस घरबसल्या मोठ्या स्क्रीनचा अनुभ देते. याची किंमत सुमारे 2,69,987 रुपये आहे.
BoAt Airdopes 71 देखील एक चांगले गिफ्ट ठरणार आहे. यामध्ये 40 तासांचा प्लेबॅक आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. IPX4 रेटिंग आणि लो लेटेंसी याला वर्कआउट आणि गेमिंगसाठी एक चांगलं ऑप्शन बनवते.
Ans: स्मार्ट इअरबड्स, स्मार्टवॉच, ब्लूटूथ स्पीकर, पॉवर बँक, फिटनेस बँड आणि स्मार्ट अॅक्सेसरीज हे सर्वाधिक लोकप्रिय गिफ्ट्स आहेत.
Ans: होय, ₹1,000 ते ₹5,000 दरम्यान अनेक उपयुक्त आणि आकर्षक गॅझेट्स उपलब्ध आहेत.
Ans: समोरच्या व्यक्तीची गरज, वय, टेक वापरण्याची सवय आणि बजेट लक्षात घ्यावे.