Free Fire Max: गेम मध्ये झाली नव्या इव्हेंटची एंट्री, मजेदार Puffer Ride इमोट मोफत मिळवण्याची हीच खरी संधी
टेक विश्व सज्ज! CES 2026 चा काउंटडाऊन झाला सुरु, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स ठरणार गेमचेंजर
फ्री फायर मॅक्समध्ये नवीन फेडेड व्हिल इव्हेंट सुरू झाला आहे. या इव्हेंटमध्ये प्लेअर्सना Puffer Ride Emote जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसं तर या इव्हेंटमध्ये 10 रिवॉर्ड्स उपलब्ध आहेत. मात्र प्लेअर्स केवळ 8 रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात. त्यामुळे 10 पैकी 2 रिवॉर्ड्स प्लेअर्सना त्यांच्या लिस्टमधून काढून टाकावे लागणार आहेत. आता उरलेले 8 रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी प्लेयर्सना स्पिन करावे लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फेडेड व्हिल ईव्हेंटध्ये रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावं लागणार आहे. या ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. प्रत्येक स्पिननंतर डायमंड्सची संख्या वाढणार आहे. दुसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 19 डायमंड्स, तिसऱ्यांदा स्पिन करण्यासाठी 39 डायमंड्स, चौथ्यांदा स्पिन करण्यासाठी 69 डायमंड्स आणि पाचव्यांदा स्पिन करण्यासाठी 99 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. सहाव्यांदा स्पिन करण्यासाठी 149 डायमंड्स, सातव्यांदा स्पिन करण्यासाठी 199 डायमंड्स आणि आठव्यांदा स्पिन करण्यासाठी 499 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.






