Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत
Vivo X100 Pro मध्ये Dimensity 9300 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन परफॉर्मंसमध्ये देखील दमदार आहे. ज्यांना स्मार्टफोन फोटोग्राफी करण्याची आवड आहे, अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरणार आहे. यामध्ये 50MP प्रायमरी सेंसर, 50MP वाइड-अँगल कॅमेरा आणि 50MP टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. खरं तर हा स्मार्टफोन 89,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता हा स्मार्टफोन तुम्हाला अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अॅमेझॉनवर Vivo X100 Pro 5G (Asteroid Black, 16GB रॅम+ 512GB स्टोरेज) हा स्मार्टफोन आता केवळ 59,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या लाँचिंग किंमतीपेक्षा 30,000 रुपयांनी कमी आहे. हा स्मार्टफोन 89,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. फ्लॅट डिस्काऊंट व्यतिरिक्त ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म यूजर्सना स्कॅपिया फेडरल बँक क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करण्यावर अतिरिक्त सवलती देखील देत आहे. यामुळे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे आणि तुम्हाला बचत करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय ग्राहक 2,109 रुपये प्रति महीना ईएमआय पर्याय वापरून देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. तसेच जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर Vivo X100 Pro 5G (Asteroid Black, 16GB रॅम+ 512GB स्टोरेज)ची किंमत 44,300 रुपयांपर्यंत कमी होणार आहे. तुमच्या जुन्या डिव्हाइसचे एक्सचेंज मूल्य तुमच्या डिव्हाइसच्या ब्रँड, मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.
Meta ची नवी प्रायव्हसी पॉलिसी ठरणार डोकेदुखी! AI मुळे Facebook-Instagram यूजर्सवर होणार थेट परिणाम
Vivo X100 Pro 5G मध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह एक 6.78-इंच LTPO कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये Dimensity 9300 चिपसेट आहे, जो 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह ZEISS-ट्यून्ड 50MP Sony IMX989 सेंसर, एक 50MP वाइड-अँगल कॅमेरा आणि OIS सह 50MP टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 14-बेस्ड Funtouch OS 14 वर आधारित आहे. याशिवाय, Vivo X100 Pro मध्ये 100W फ्लॅशचार्ज सपोर्टसह 5,400mAh बॅटरी देण्यात आली आहे.






