
'हा' आहे जगातील पहिला AI फाइटर जेट! पायलट आणि रनवेची गरज नाही, अशी टेक्नोलॉजी पाहून सर्वच होतील अचंबित
Tech Tips: हिवाळ्यात किती असावं तुमच्या फ्रीजचं तापमान? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या सविस्तर
शिल्ड AI च्या या X-BAT जेटला Hivemind नावाच्या AI सॉफ्टवेयरद्वारे चालवले जाणार आहे. हे जेट पूर्णपणे ऑटोमेटेड असून ते वर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग (VTOL) सिस्टमद्वारे उड्डाणासाठी देखील सक्षम आहे. याला उडण्यासाठी कोणत्याही रनवेची गरज नाही. हे एखाद्या जहाज, द्वीप किंवा छोट्या भागातून सहजपणे उड्डाण करू शकते. सध्या हे स्केल मॉडेलच्या स्वरुपात सादर करण्यात आले आहे आणि भविष्यात यामध्ये जेट इंजिन आणि थ्रस्ट वेक्टरिंग नोजल्स देखील लावले जाणार आहेत. ज्यामुळे ते Mach 4 (सुमारे 5000 किमी/तास) वेगाने उडू शकेल. (फोटो सौजन्य – X)
Defence News ने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, X-BAT ची रेंज 2,000 नॅटिकल माइल्सहून अधिक असणार आहे. हे एयर-टू-एयर आणि एयर-टू-ग्राउंड अशी दोन्ही प्रकरारची शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असेल. याचे VTOL सिस्टम त्याला कोणत्याही स्थानावरून उड्डाण करण्याची आणि उतरण्याची क्षमता देते. ज्यामुळे हे AI फाइटर जेट पारंपरिक जेट्सच्या तुलनेत खूपच लवचिक आणि प्राणघातक बनते.
कंपनीने माहिती दिली आहे की, X-BAT चे पहिले वर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग टेस्ट फ्लाइट 2026 मध्ये केले जाणार आहे. यानंतर 2028 पर्यंत त्याची पूर्ण वॅलिडेशन प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि 2029 पासून याचे उत्पादन सुरु केले जाणार आहे. शिल्ड AI सध्या अनेक उद्योग भागीदारांसोबत काम करत आहे, ज्यामुळे त्याला लवकर बाजारात लाँच केले जाऊ शकेल. कंपनीने अद्याप याच्या किंमतीचा खुलासा केला नाही. मात्र कंपनीने दावा केला आहे की, हे F-16 सारख्या फाइटर जेट्सपेक्षा खूप स्वस्त असणार आहेत.
X-BAT मुळे हवाई युद्धाचे समीकरण बदलू शकते, असा अंदाज आता वर्तवला जात आहे. याच्या Hivemind सॉफ्टवेयरच्या मदतीने हे कोणत्याही मानवी नियंत्रणाशिवाय उडू शकते. ते एकट्याने मोहिमा पार पाडू शकते आणि इतर लढाऊ विमानांसोबत सहयोगी लढाऊ विमान म्हणून देखील काम करू शकते. शील्ड AI चा दावा आहे की हे AI जेट भविष्यातील युद्धांमध्ये गेम-चेंजर ठरेल, कारण ते रनवेशिवाय कुठूनही प्रक्षेपित करू शकते आणि प्राणघातक हल्ले करू शकते.