Book My Show ची सर्विस ठप्प झाल्याने युजर्स नाराज; Coldplay कॉन्सर्टमुळे निर्माण होतेय समस्या
तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म Book My Show ची वेबसाइट आणि ॲप आज म्हणजेच रविवार, 22 सप्टेंबर रोजी क्रॅश झाले. ब्रिटीश बँड कोल्डप्लेच्या इंडिया परफॉर्मन्ससाठी दुपारी 12 वाजता बुकिंग सुरू झाल्यानंतर काही वेळातच Book My Show ची वेबसाईट क्रॅश झाले. मात्र, सुमारे अर्ध्या तासानंतर पुन्हा बुकिंग सुरू झाले. Coldplay 2016 नंतर भारतात सादर होत आहे. पुढील वर्षी 18 आणि 19 जानेवारीला नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर हे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. तिकिटांची किंमत 2,500 रुपयांपासून सुरू होते. सर्वात महाग तिकीट लाउंजसाठी आहे ज्याची किंमत 35,000 रुपये आहे.
हेदेखील वाचा- ‘हे’ आहेत भारतातील आवडते OTT प्लॅटफॉर्म
Coldplay ची सुरुवात युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून झाली. Coldplay हा 1997 मध्ये लंडनमध्ये स्थापन झालेला ब्रिटिश रॉक बँड आहे. बँडमध्ये गायक आणि पियानोवादक ख्रिस मार्टिन, गिटार वादक जॉनी बकलँड, बास वादक गाय बेरीमन, ड्रमर आणि तालवादक विल चॅम्पियन आणि व्यवस्थापक फिल हार्वे यांचा समावेश आहे. ते विशेषतः त्यांच्या लाइव्ह परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात. बँडचा उगम युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे झाला, ज्याने स्वतःला बिग फॅट नॉइज, नंतर स्टारफिश आणि आता Coldplay म्हटले. बँडला ग्रॅमी अवॉर्ड्स, ब्रिट अवॉर्ड्ससह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)
Book My Show हे सध्या भारतातील सर्वात मोठे मनोरंजन तिकीट प्लॅटफॉर्म आहे. रविवारी दुपारी बुक माय शोची सेवा अचानक बंद झाली. बऱ्याच लोकांना यावेळी समस्यांना सामोरे जावे लागले आणि दुपारी 12 च्या सुमारास ते X प्लॅटफॉर्मवरवर पोस्ट करू लागले. या प्लॅटफॉर्मवर Coldplay च्या तिकीट बुकिंगसह हे पोर्टल डाऊन झाले. मात्र, काही काळानंतर या सेवा पुन्हा सुरळीत झाल्या.
हेदेखील वाचा- Amazon-Flipkart Festive Sale: अॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या सेलमधून खरेदी करताना काळजी घ्या, एक चुकीचं क्लिक आणि होईल लाखोंच नुकसान
अनेक वापरकर्त्यांनी X प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले. #BookMyShow हा हॅशटॅग वापरून, अनेक वापरकर्त्यांनी माहिती दिली की ते या ॲपच्या सेवेत प्रवेश करत नाहीत. तो X प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करू लागला. वापरकर्त्यांनी X च्या माध्यमातून प्लॅटफॉर्म बंद झाल्याची माहिती दिली. अल्पावधीतच, ते Google वर देखील वेगाने ट्रेंड करू लागले. #BookMyShow हा हॅशटॅग वापरून अनेकांनी पोस्ट केले. येथे अनेकांनी आपल्या समस्या मांडल्या आणि हे ॲप काम करत नसल्याचे सांगितले. याबाबत अनेक मीम्स समोर आले आहेत.
Coldplay हा जागतिक संगीत बँड आहे. हे जगभर लोकप्रिय आहे. या बँडचा दौरा पुढील वर्षी भारतात होणार आहे, त्यासाठीचे बुकिंग आतापासून सुरू होत आहे. या बँडचा कार्यक्रम 9 वर्षानंतर प्रथमच भारतात आयोजित केला जाणार आहे. Book My Show च्या सेवेत व्यत्यय येण्याचे कारण म्हणजे Coldplay कॉन्सर्ट. जगभरात लोकप्रिय असलेल्या या म्युझिक बँडची लोकप्रियता भारतातही उच्च दर्जाची आहे. भारतातील या इव्हेंटबाबत युजर्समध्ये विशेष क्रेझ आहे आणि तिकीट बुकिंगमधून ही क्रेझ दिसून येते.