Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TikTok Unbanned: बॅन झालेल्या TikTok ची अमेरिकेत पुन्हा एंट्री, Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवरील बंदी 75 दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या टिकटॉक अमेरिकेत पुन्हा परतले आहेत. पण यावेळी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 15, 2025 | 10:45 AM
TikTok Unbanned: बॅन झालेल्या TikTok ची अमेरिकेत पुन्हा एंट्री, Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध

TikTok Unbanned: बॅन झालेल्या TikTok ची अमेरिकेत पुन्हा एंट्री, Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध

Follow Us
Close
Follow Us:

लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप टिकटॉकने अमेरिकेत पुन्हा एंट्री केली आहे. बॅन करण्यात आलेलं सोशल मीडिया अ‍ॅप टिकटॉक आता अमेरिकेत पुन्हा उपलब्ध झालं आहे. खरं तर अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या अ‍ॅपवर बंदी घातली होती. मात्र आता हे अ‍ॅप अमेरिकेत पुन्हा परतले आहे. अमेरिकेने चीनी अ‍ॅप टिकटॉकवर काही गंभीर आरोप करत त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हे लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप टिकटॉक अमेरिकेत परतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर टिकटॉक अमेरिकेतील Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध झाले आहे.

JioHotstar: हॉटस्टार आणि जिओ सिनेमा युजर्सचं जुनं सबस्क्रिप्शन सुरू राहणार, की पुन्हा भरावे लागणार पैसे? जाणून घ्या

राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली होती. टिकटॉक ही चिनी कंपनी बाईटडान्सच्या मालकीची आहे. अमेरिकेने दावा केला की हे अ‍ॅप युजर्सचा डेटा स्टोअर करते. चीन या डेटाचा वापर अमेरिकन नागरिकांची हेरगिरी करण्यासाठी आणि तेथील जनमतावर प्रभाव पाडण्यासाठी करू शकतो. या आरोपांमुळे, 2025 च्या सुरुवातीला गुगल आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअर्समधून हे अ‍ॅप काढून टाकण्यात आले होते. मात्र आता हे अ‍ॅप पुन्हा अमेरिकेत उपलब्ध झाले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

टिकटॉक अमेरिकेत कसे परतले?

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच टिकटॉकवरील बंदी 75 दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले. या ऑर्डरनंतर, टिकटॉक अ‍ॅपने अमेरिकेत पुनरागमन केले आहे. आता अ‍ॅपल आणि गुगलने पुन्हा एकदा त्यांच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये टिकटॉक उपलब्ध करून दिले आहे, ज्यामुळे आता अमेरिकेतील स्मार्टफोन युजर्स त्यांच्या फोनवर टिकटॉक डाऊनलोड करण्यासाठी सक्षम असणार आहे. तथापि, टिकटॉकवरील ही बंदी अद्याप पूर्णपणे उठवण्यात आलेली नाही. बाईटडान्ससाठी हा तात्पुरता दिलासा आहे.

टिकटॉकचे काय होईल?

टिकटॉकवरील बंदी उठवण्यात आली असली तरी, अमेरिकन सरकारने बाईटडान्सला टिकटॉकची मालकी अमेरिकन कंपनीकडे सोपवण्यास सांगितले आहे अन्यथा हे अ‍ॅप पूर्णपणे बंद करावे लागेल असे अमेरिकेने सांगितलं आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की जर कंपनीने या बंदीचे उल्लंघन केले तर टिकटॉकला प्रति वापरकर्ता $5000 दंड होऊ शकतो.

अमेरिकन सरकार आणि टिकटॉकचा करार होण्याची शक्यता

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बाईटडान्सला आणखी एक ऑफर दिली आहे. यानुसार, अमेरिकेतील टिकटॉकचे कामकाज संयुक्त उपक्रमाद्वारे चालवता येईल. यासाठी कंपनीला अमेरिकन कंपनीसोबत भागीदारी करावी लागेल. तथापि, यासाठी चीनची मान्यता देखील आवश्यक असेल. जर चीनने या कराराचे पालन केले नाही तर त्याला आर्थिक निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते, असेही ट्रम्प यांनी धमकीच्या स्वरात म्हटले आहे. त्यामुळे आता टिकटॉक अमेरिकेत किती काळ सुरु राहणार हे त्यांच्या वागणूकीवर अवलंबून असणार आहे.

नव्या रुपात लाँच झाला Redmi चा ‘हा’ पावरफुल 5G स्मार्टफोन! AI कॅमेरा आणि बरचं काही.. किंमत केवळ इतकी

भारतातही टिकटॉकवर बंदी आहे.

टिकटॉक अनेक देशांमध्ये वादांनी वेढलेले आहे. 2020 मध्ये भारताने या अ‍ॅपवर पूर्णपणे बंदी घातली. यासोबतच, युरोपियन युनियन या अ‍ॅपच्या डेटा सुरक्षा मानकांची देखील चौकशी करत आहे. त्यामुळे टीकटॉक अनेक देशांमध्ये अडचणीत सापडलं आहे.

Web Title: Tiktok returned to america and now available on google play store and apple app store tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • America
  • social media app
  • Tech News

संबंधित बातम्या

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर
1

लाखो लोकं गमावणार त्यांच्या नोकऱ्या? 2030 पर्यंत माणसांची जागा घेणार हे तंत्रज्ञान, करणार सर्व कामं! जाणून घ्या सविस्तर

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती
2

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती

Secret Of Apple Logo: अर्धे सफरचंदच का बनला जगातील सर्वात मोठ्या टेक ब्रँडचा लोगो? काय आहे या डिझाईनमागील रहस्स?
3

Secret Of Apple Logo: अर्धे सफरचंदच का बनला जगातील सर्वात मोठ्या टेक ब्रँडचा लोगो? काय आहे या डिझाईनमागील रहस्स?

Arattai Messaging App: Apple अ‍ॅप स्टोअरवर नंबर 1 ठरला हा ‘मेड-इन-इंडिया’ मेसेजिंग अ‍ॅप, WhatsApp ला करणार का रिप्लेस?
4

Arattai Messaging App: Apple अ‍ॅप स्टोअरवर नंबर 1 ठरला हा ‘मेड-इन-इंडिया’ मेसेजिंग अ‍ॅप, WhatsApp ला करणार का रिप्लेस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.