काय सांगता! आता चार लोकं एकत्र करू शकतात डेट, Tinder ने लाँच केलेल Double Date फीचर आहे तरी काय?
तुम्ही देखील Tinder वर एखाद्या स्पेशल व्यक्तिला शोधत आहात का, तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्म Tinder ने त्यांच्या युजर्ससाठी एक अनोखं फीचर लाँच केलं आहे. या फीचरचं नाव ‘Double Date’ फीचर आहे. या नवीन फीचरच्या मदतीने आता दोन मित्र मिळून दुसऱ्या जोडीसोबत मॅच करू शकणार आहेत. या फीचरच्या नावावरून असं समजतं की आता तुम्ही एकटे नाही तर तुमच्या एखाद्या मित्रासोबत डबल डेटवर जाऊ शकणार आहात. याचा अर्थ डेटिंग आता एक ग्रुप अॅक्टिविटीप्रमाणे असणार आहे. नवीन फीचर युजर्सचा अनुभव अधिक मजेदार आणि चांगला बनवणार आहे.
Double Date फीचरच्या मदतीने दोन मित्र मिळून टिंडरवर आणखी एका जोडीसोबत जोडले जाऊ शकतात. याचा अर्थ, आता डेटिंग फक्त दोन लोकांमध्ये राहणार नाही, तर चार लोक एकत्र बोलू शकतात आणि एकत्र एक उत्तम डेट प्लॅन करू शकतात.
Tinder अॅप ओपन करा आणि त्यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला डबल डेट आयकॉन दिसेल. इथे तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला देखील ईनव्हाईट करू शकता. आता जेव्हा तुम्ही आणि तुमचा मित्र टिंडरवर लॉगिन कराल, तेव्हा तुम्ही एकत्र प्रोफाईल पाहू शकणार आहात आणि तुम्ही आणि तुमचा मित्र दोघंही ज्या प्रोफाईलला पसंत कराल, त्यांच्यासोबत मॅच केलं जाईल. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर दोन्ही ग्रुपमधील लोकांनी (इथे दोन लोक आणि तिथे दोन लोक) एकमेकांवर राइट स्वाइप केलं, तर टिंडर एक ग्रुप चॅट तयार करेल. यामध्ये, चार लोक एकमेकांशी बोलू शकतात, एकमेकांना जाणून घेऊ शकतात. या ठिकाणी जर चारही लोकांना एकमेकांचे म्हणणे पटले, आवडी जुळल्या तर ते वास्तविक जगात देखील डबल डेटचा प्लॅन करू शकतात.
Tinder चे प्रोडक्ट मार्केटिंग हेड Cleo Long यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणांवरील डेटिंगबाबतचा मानसिक दबाव कमी करणे हा या फीचरचा महत्त्वाचा उद्देश आहे. एखाद्या व्यक्तिला एकट्यात भेटायचं असेल तर अनेकजण गडबडतात. त्यांना काय बोलावं सूचत नाही, परंतु जेव्हा मित्र एकत्र असतात तेव्हा वातावरण हलके आणि मजेदार बनते. याच सर्वाचा विचार करून हे नवीन फीचर सुरु करण्यात आलं आहे. Tinder चं म्हणणं आहे की, हे नवीन फीचर सोशल एक्सपीरियंस वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
सध्या हे फीचर अमेरिकेत लाँच करण्यात आले आहे. पण कंपनीने स्पष्ट केले आहे की ते जुलै 2025 पर्यंत जगभरात उपलब्ध करून दिले जाईल. याचा अर्थ भारतातील यूजर्स देखील लवकरच या फीचरचा लाभ घेऊ शकतील.