Meta ने केली मोठी घोषणा! WhatsApp वर सुरु होणार चॅनल सब्सक्रिप्शन, आता फेवरेट अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
WhatsApp युजर्ससाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मेटाने WhatsApp च्या नवीन नियमांबाबत काही घोषणा केली आहे. कंपनी नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी नवीन अपडेट्स घेऊन येत असते. आता देखील कंपनीने एक नवीन अपडेट आणलं आहे, हे अपडेट सध्या प्रचंड चर्चेत आहे. मेटाने WhatsApp मधील काही बदलांबाबत घोषणा केली आहे. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे चॅनल सब्सक्रिप्शन. सध्या सर्वत्र चॅनल सब्सक्रिप्शन फीचरची प्रचंड चर्चा सुरु आहे. कारण या फीचरअंतर्गत युजर्सना नवीन अपडेट्साठी पैसे द्यावे लागणार आहेत. म्हणजेच आता चॅनल्सचे एक्सक्लूसिव अपडेट्स पाहण्यासाठी युजर्सना मंथली फीस भरावी लागणार आहे.
WhatsApp काही महिन्यांपूर्वी चॅनेलचं नवीन फीचर सुरु करण्यात आलं आहे. यामध्ये तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या चॅनल्सना फॉलो करू शकता. जसं की, न्यूज, स्पोर्ट्स किंवा एखाद्या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे अपडेट्स. आतापर्यंत तुम्ही या चॅनल्सना फॉलो करून त्यांचे अपड्टेस पाहू शकत होतात. मात्र आता यातील काही अपडेट्स पाहण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. म्हणजेच चॅनलमधील काही कंटेट केवळ पेड सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. याचा अर्थ असा की तुम्ही त्या चॅनेलला सबस्क्राईब केले तरच तुम्हाला काही एक्सक्लूसिव माहिती किंवा अपडेट्स मिळतील. हे फीचर अशा युजर्ससाठी सुरु करण्यात आलं आहे, ज्यांना त्यांच्या फेवरेट चॅनलमधील अपडेट्स लवकरात लवकर मिळवायचे असतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
WhatsApp ने चॅनल अॅडमिन्स आता त्यांचा चॅनेल्स अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकणार आहेत. यासाठी त्यांना प्रमोटेड चॅनल्स फीचर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या फीचरच्या मदतीने आता अॅडमिन्स त्यांचं चॅनल WhatsApp वर प्रमोट करू शकणार आहेत. ज्यामुळे त्यांच्या चॅनलची रीच आणि फॉलोअर्स दोन्ही वाढण्यासाठी मदत होणार आहे.
YouTube वर व्हायरल व्हायचंय? यावेळी पोस्ट करा तुमचा व्हिडीओ आणि मिळवा अधिक व्ह्युज
WhatsApp यूजर्ससाठी आणखी एक मोठा बदल केला जात आहे. आता स्टेटसमध्ये जाहिराती दिसणार आहेत. आता जेव्हा तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा तुम्हाला त्या दरम्यान जाहिराती देखील दिसू शकतात. या जाहिराती तुमच्या आवडींवर आधारित असतील जेणेकरून तुम्हाला ज्या गोष्टी पहायला आवडतात त्या तुम्हाला दिसतील. तथापि, काही वापरकर्ते या बदलाबद्दल खूश नाहीत कारण यामुळे व्हॉट्सअॅपचा वैयक्तिक अनुभव थोडा कमी होऊ शकतो. परंतु व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, ही एक मोठी संधी आहे.