
WhatsApp Update: हॅकर्सची झोप उडवा! फक्त एक सेटिंग आणि तुमचं WhatsApp अकाऊंट होईल सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर
डिसअपीयरिंग मेसेज- जर तुम्ही एखाद्या यूजरसोबत असा डेटा शेअर करत असाल ज्याची केवळ एकदाच गरज आहे आणि नंतर हा डेटा व्यर्थ ठरणार आहे, तर अशा परिस्थितीत तुम्ही डिसअपीयरिंग मेसेजची मदत घेऊ शकता. तुम्ही सेट केलेल्या ठरावीक वेळेनंतर हे मेसेज गायब होणार आहेत. त्यामुळे या मेसेजचा चुकीचा वापर होण्याचे धोके कमी होतात. तसेच हे मेसेज गायब झाल्यानंतर पुन्हा रिस्टोअर करणं अत्यंत कठीण होतं.
टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल करा- तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल करू शकता. इथे तुमच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटला आणखी एक सुरक्षेचा स्थर प्रदान केला जातो. यामुळेच अनअथॉराइज्ड एक्सेसपासून तुमच्या अकाऊंटची सुरक्षा होते.
चॅट लॉकमुळे मिळणार आणखी प्रायव्हसी- जर तुम्हाला वाटत असेल की कोणीही तुमच्या फोनमधील चॅट्स वाचू नये तर अशावेळी तुम्ही चॅट लॉक सेटिंगची मदत घेऊ शकता. हि सेटिंग चॅटची सुरक्षा आणखी वाढवते. हे फीचर अशा लोकांसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतं, ज्यांचा स्मार्टफोन अनेक लोकं वापरतात.
रीड रिसीट डिसेबल करा- व्हॉट्सअॅपवर जेव्हा एखादा यूजर समोरील व्यक्तीने पाठवलेले मेसेज वाचतो तेव्हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला तिथे ब्लू टिक दिसते. याला रीड रिसीट म्हटलं जाते. तुम्ही तुमच्या सेटिंग्जमध्ये हे डिसेबल करू शकता, ज्यामुळे व्हॉट्सअॅपला तुमच्या अॅक्टिव्हिटी ट्रॅक करणं कठीण होईल.
ऑटोमॅटिक डाउनलोड बंद करा- अनेक लोकं व्हॉट्सअॅपवर ऑटोमॅटिक डाउनलोड इनेबल करतात. ज्यामुळे मेसेजमधील फोटो, व्हिडीओ किंवा प्रत्येक अटॅचमेंट आपोआप डाऊनलोड केली जाते. यामध्ये अनेक मालवेयर असलेल्या फाइल्स देखील डाऊनलोड होतात. यामुळे तुम्ही व्हॉट्सअॅपमधील ऑटोमॅटिक डाउनलोड बंद करू शकता. ज्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वत:हून डाऊनलोड करत नाही तोपर्यंत कोणतीही फाईल फोनमध्ये डाऊनलोड केली जाणार नाही.
Ans: स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन आणि एक सक्रिय मोबाइल नंबर आवश्यक असतो.
Ans: होय. WhatsApp मध्ये End-to-End Encryption असते, त्यामुळे तुमच्या चॅट्स फक्त तुम्ही आणि समोरची व्यक्तीच वाचू शकतात.
Ans: जर टू-स्टेप व्हेरिफिकेशन बंद असेल किंवा OTP कुणाला दिला तर WhatsApp हॅक होऊ शकतो. योग्य सेटिंग्सने तो सुरक्षित ठेवता येतो.