प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी
ट्रंप मोबाईल कंपनीने गेल्यावर्षी Trump Mobile T1 ची घोषणा केली होती. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील जाहिर करण्यात आले होते. तसेच कंपनीने घोषणा केली होती, की ग्राहक या स्मार्टफोनची प्री बुकींग देखील करू शकतात आणि त्यासाठी त्यांना 499 डॉलर म्हणजेच सुमारे 42,800 रुपये खर्च करावे लागणार आहेत. कंपनीने केलेल्या या घोषणेनंतर अनेक ग्राहकांनी या स्मार्टफोनची प्री बुकिंग केली. मात्र अद्याप हा स्मार्टफोन डिलीव्हर करण्यात आला नाही. म्हणजेच अनेक महिन्यांपूर्वी प्री-बुकींग करण्यात आलेला फोन अद्याप डिलीव्हर झाला नाही. (फोटो सौजन्य – X)
अँड्रॉईड ऑथोरिटीने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, Trump T1 मोबाइल फोन बुक करणारा एक यूजर सी. स्कॉट ब्राउन ने सांगितलं की, प्री-ऑर्डर करून आतापर्यंत 7 महिने झाले आहेत. मात्र अद्याप स्मार्टफोनची डिलीव्हरी झाली नाही. सी. स्कॉट ब्राउनने फोन बुक करण्यासाठी 100 डॉलर म्हणजेच सुमारे 8500 रुपये डिपोजिट केले होते. अनेक यूजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे या प्रकरणाची तक्रार केली आहे. अमेरिका फेडरल ट्रेड कमीशनने ट्रंप मोबाईलद्वारे केल्या जाणाऱ्या बनावट प्रचार आणि बेकायदेशीर पद्धतींविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे.
काही वेबसाईट्स आणि सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, ट्रंप यांची कंपनी फोनच्या प्री-ऑर्डरसाठी 100 डॉलरचे सिक्योरिटी डिपॉजिट घेत आहे. मात्र प्री ऑर्ड करून डिपॉजिट दिल्यानंतर देखील फोनची डिलीव्हरी केली जात नाही. त्यामुळे हा एक स्कॅम असल्याचे अनेकांनी म्हटलं आहे. फेडरल ट्रेड कमीशनने ट्रंप मोबाईलला लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे की, अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्रम्प मोबाईलची जाहिरात गेल्या वर्षी “मेड इन अमेरिका” म्हणून करण्यात आली होती. एफटीसीने त्यांच्या पत्रात विचारले की ट्रम्प मोबाईल टी1 मधून “मेड इन अमेरिका” ब्रँडिंग आता का काढून टाकण्यात आले आहे?
याशिवाय पत्रात विचारण्यात आलं आहे की, फोन डिलीव्हरीसाठी एवढा वेळ का लागत आहे? यासोबतच असा दावा केला जात आहे की, कंपनीने Samsung Galaxy S25 Ultra चे रेंडर एडिट करून Trump T1 फोन प्रमोट केला आहे. यानंतर हा फोन iPhone 16 Pro गोल्डनप्रमाणेच वाटत आहे. हे सर्व दिशाभूल करणाऱ्या प्रचार आणि घोटाळ्याकडे निर्देश करते. एफटीसी सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या कंपनीची चौकशी करत आहे. ट्रम्प मोबाईलविरुद्धच्या तक्रारीवर इतर कोणत्याही कंपनीप्रमाणेच कारवाई केली जाईल असे व्यापार आयोगाने म्हटले आहे.






