2016 vs 2026: 10 वर्षांचा मोठा टर्निंग पॉइंट! सोशल मीडियावर का पडतोय जुन्या आठवणींचा पाऊस? नेमकं काय चाललंय, जाणून घ्या
इंस्टाग्रामपासून फेसबुक आणि एक्स (ट्विटर) वर सध्या ‘2026 is the new 2016’ ट्रेंड सुरु झाला. सोशल मीडिया यूजर्स 2016 मध्ये क्लिक केलेले, जुने अस्पष्ट फोटो, स्नॅपचॅट फिल्टर्स आणि फुललेल्या हेअरस्टाइलसह फोटो शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. भारतात अनेक सिलेब्रिटीज देखील हा ट्रेंड फॉलो करत आहेत. करीना कपूर, आलिया भट्ट, दिया मिर्जा आणि अनन्या पांडेयसह अनेक कलाकारांनी 2016 मधीस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर सिलेब्रिटीजच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. पण यूजर्स सोशल मीडियावर 2016 मधील फोटो का शेअर करत आहेत, हा ट्रेंड नक्की काय आहे, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – instagram)
हा ट्रेंड म्हणजे एक प्रकारची ‘नॉस्टॅल्जिया ट्रिप’ आहे. 2026 वर्षाच्या सुरुवातीसह, लोकं एक दशकापूर्वीच्या म्हणजे 2016 च्या वर्षातील आठवणींना उजाळा देत आहेत. लोकं त्यांचे 10 वर्षांपूर्वीचे फोटो पोस्ट करत आहेत आणि सांगत आहे की, त्यावेळी इंटरनेट आणि आयुष्य दोन्ही अत्यंत सोपे होते. याच ट्रेंडमुळे अनेक मोठे सेलिब्रिटी देखील या ट्रेंडसोबत जोडले जात आहेत. याशिवाय, इंस्टाग्रामने त्यांच्या ऑफिशियल पेजवर देखील त्या काळातील लोगो, सर्वाधिक फॉलो केलेले स्टार आणि प्रसिद्ध इमोजी लक्षात ठेवून हा ट्रेंड अधिक व्हायरल केला.
निरागसपणा आणि ऊर्जा- आजचा सोशल मीडिया खूपच क्युरेटेड आणि कृत्रिम झाला आहे. प्रत्येक फोटो परिपूर्ण असावा, लाइटिंग योग्य असावी आणि कॅप्शनमध्ये सखोल अर्थ असला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. पण 2016 हा असा काळ होता जेव्हा लोक कोणत्याही विचाराशिवाय, योग्य कॅप्शनशिवाय आणि व्यवस्थित लाइटिंगशिवाय फोटो पोस्ट करायचे. लोकांना तोच निरागसपणा आणि ऊर्जा परत मिळवायची आहे.
पॉप कल्चरचा गोल्डन पीरियड- भारतीयांसाठी 2016 हे केवळ एक वर्ष नाही तर आठवणींचा खजिना आहे. हा एक असा काळ होता जेव्हा डबस्मॅश व्हिडीओ प्रत्येक घरात तयार केले जात होते आणि स्पॅपचॅट फिल्टर्सने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. ऐश्वर्या रायच्या पर्पल लिपस्टिकपासून लियोनार्डो डिकैप्रियोच्या पहिल्या ऑस्कर पर्यंत 2016 मध्ये अनेक गोष्टी घडल्या आहेत.
2016 मध्ये नेटफ्लिक्स भारतात आला होता, ज्यामुळे ओटीटीची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली होती. पीपीएपी (पेन-अननस-अॅपल-पेन) सारखे व्हायरल गाणे जे आजही लोकं गुणगुणत आहेत. याच सर्व आठवणींना आता 10 वर्षांनी पुन्हा उजाळा दिला जात आहे.






